मुंबई Nanded Gurudwara : महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक येत असतात. शीख समुदायासह अन्य समुदायातील भाविकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात. हे लक्षात घेता नांदेड येथील गुरुद्वारासाठी 'तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 2024' (Gurdwara Act 2024) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
शीख समुदायासह अन्य भाविकांची असते गर्दी: महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात तख्त सचखंड श्री हुजूर अवचलनगर साहिब हा मुख्य गुरुद्वारा आहे. शीख समुदायांच्या अधिपत्याखाली असलेल्या पाच उच्च आणि पवित्र जागांपैकी हा एक गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारामध्ये श्री गुरु गोविंद सिंहजींनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. नांदेड शहरात असलेल्या या गुरुद्वाराची निर्मिती इ.स. 830 ते 891 दरम्यान पंजाबचे शासक महाराज रणजीत सिंहजींनी केली होती. अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात शीख समुदायाचे भाविक येत असतात. त्यासोबत देशभरातून अन्य समुदायाचे भाविकही या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यामुळे या गुरुद्वाराच्या प्रशासकीय कामकाजात मोठी वाढ झाली आहे. ही बाब विचारात घेता या गुरुद्वाराच्या 'तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा अधिनियम 2024' लागू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे राज्य सरकारचा विचार? राज्य सरकारतर्फे तयार केलेल्या या विधेयकाचं प्रारूप मान्य झाल्यानंतर दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्रीहजूर अबचलनगर साहिब निवडणूक नियम आणि त्यांचे उपविधी तयार करण्यात येणार आहेत. हा अधिनियम तयार करताना 1956 च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी न्यायमूर्ती जयज भाटिया अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायालयीन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तसेच अभ्यास समितीनं दिलेल्या शिफारशी आणि अहवाल लक्षात घेऊन हा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
हेही वाचा: