पुणे Action Against Pubs And Bar In Pune : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत म्हणाले की, कल्याणी नगर येथील अपघातानंतर जवलापा येथील 49 पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 57 पब आणि बारवर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
कारवाई पुढेही चालू राहणार : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत पुढे म्हणाले की, या कारवाईमध्ये पब आणि बारच्या वेळा तसेच त्यांच्या प्रिमायसेसमध्ये काही बदल केला आहे. त्याचप्रमाणे रूफटॉप बाबत आलेल्या तक्रारी, विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
'चांदणी बार'ची छमछम कायमस्वरूपी बंद : नियमांना ढाब्यावर बसवून चालविल्या जाणाऱ्या बिअर बार विरुद्ध पोलीस आणि पालिका प्रशासन नेहमीच कारवाई करत असते. याचा प्रत्यय उल्हासनगर येथील चांदणी बारवर 31 डिसेंबर, 2021 रोजी करण्यात आलेल्या कारवाईतून आला. यावेळी उल्हासनगर शहरातील सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या चांदणी बारला सील करण्यात आले होते. पोलीस आणि महापालिकेने ही संयुक्तरित्या कारवाई केली होती. त्यामुळे 'चांदणी बार'ची छमछम कायमस्वरूपी बंद झाली होती.
उशीरापर्यंत बारमध्ये छमछम.. : उल्हासनगर कॅम्प नंबर ३ भागातील १७ सेक्शन परिसरात चांदणी लेडीज बार होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व कडक निर्बंध लावले असताना सर्रास बार चालू ठेवला जात होता. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी आणि उल्हासनगर महापालिकेने चांदणी बारवर कारवाई करत तो सील केला होता.
चांदणी बारवर ८० पेक्षा अधिक गुन्हे : आतापर्यंत या बारवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ८० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे येथे सुरू असणारी छमछम कायमस्वरूपी बंद होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली होती. कारवाई वेळी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गवारी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
- शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा; 'या' दोन नेत्यांना उमेदवारी - Vidhan Parishad Election 2024
- नशेडी कारचालकानं आईसह दीड महिन्यांच्या बाळाला उडवलं; कारचालकानं गुन्हेगारी कनेक्शन, नेमकं काय घडलं? - Hit And Run Case Nagpur