ETV Bharat / state

गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, गावाकडं परतणाऱ्या प्रवाशांचे हाल - ST bus strike

ST bus strike ऐन सणासुदीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी बस सेवा विस्कळित झाली आहे. वेतनवाढीसह इतर मागण्यांकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

ST bus strike update
एसटी कर्मचाऱ्यांचा संप (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 11:37 AM IST

मुंबई ST bus strike - एसटी महामंडळाच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील एमएसआरटीसीच्या 250 बस डेपोपैकी 35 बस सेवा पूर्णपणं ठप्प झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या प्रवक्त्यानं दिली.

गणेशोत्सवासाठी अनेकांची सहकुटुंब मूळगावी जाण्याची घाई सुरू आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिन्यात एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं वेतनवाढीसह इतर समस्यांबाबत राज्य सरकारशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी संप सुरू केला. राज्य सरकारच्या कर्मचाप्रमाणं वेतन देण्यात यावं, अशी एसटी एसटी कामगार संयुक्त कृती समितीची मागणी आहे.

संपामुळे प्रवाशांचे हाल- एमएसआरटीसीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, संपाचा मुंबई विभागातील बस सेवेवर परिणाम झाला नाही. मुंबई विभागातील सर्व आगारांमध्ये बस सेवा सुरळीत सुरू आहे. परंतु ठाणे विभागातील बस सेवेवर अंशत: फटका बसला आहे. ठाण्यातील कल्याण, विठ्ठलवाडी डेपो पूर्णपणे बंद आहेत." पूर्व महाराष्ट्रात विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील बस सेवांवर या संपाचा परिणाम झाला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात अनेक डेपो पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता- राज्यातील एसटी महामंडळात सुमारे 15,000 बस आणि 90,000 कर्मचारी आहेत. तर एसटी बसमधून 60 लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक करतात.गणेशोत्सवानिमित्त 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून 5,000 अतिरिक्त 'गणपती स्पेशल' बस चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पेशल बस सेवेलादेखील संपाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ऑक्टोबर 2021मध्येही एसटी कर्मचाऱ्यांनी केला होता संप-यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये हजारो एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. एसटी परिवहन महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे या मागणीसाठ कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं नागरिकांचे हाल झाले होते. मुंबई उच्च न्यायालयानं संपाची दखल घेत आंदोलक कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल 2022 पर्यंत पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते.

बीड जिल्ह्यात नऊ आगारातील बस सेवा बंद- आज सकाळपासून बीड जिल्ह्यातील 9 आगारातील सर्व बस सेवा चालक आणि वाहक यांनी संप पुकारला आहे. "आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे. एसटी कर्मचारी अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यासाठी लढत आहेत. तरीही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं हे कर्मचारी सरकारचे लाडके नाहीत का? असा सवाल परिवहन महामंडळाचे कर्मचारी सरकारला करत आहेत.

या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या- सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणं वेतन देण्यात यावं, डी. अँड डी. प्रोसिजरमधील जाचक अटी रद्द कराव्यात यासह इतर मागण्या आहेत. बीड जिल्ह्यातील एस. टी. कामगार संघटना, एस.टी. कामगार सेना, कस्ट्राइब संघटना, कष्टकरी जनसंघ आणि अन्य संघटना संपात सहभाग होणार असल्याचा दावा केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.