ETV Bharat / state

खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune - SOCIETY BOUNCERS PUNE

Society Bouncers Pune : पुणे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणेरी भाषा आणि पाट्यांमुळे हे शहर राज्यात प्रसिद्ध आहे. आता आणखी एका वेगळ्या कारणामुळे या शहराची सध्या सर्वत्र चर्चा आहे ते म्हणजे सोसायटीनं आपल्या जागेत खवय्ये येऊ नये म्हणून तैनात केलेले (Pune Food Stall Bouncers) बाऊन्सर. आता तुम्ही म्हणाल की काय नवीनच भानगड, तर होय हे पुणे आहे. इथं काहीही, कधीही आणि कसंही होऊ शकतं. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर बातमी....

Society Bouncer
सोसायटीनं नेमलेले बाऊन्सर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:36 PM IST

Updated : Jun 16, 2024, 3:16 PM IST

पुणे Society Bouncers Pune : 'पुणे तिथं काय उणे' हे नेहमीच म्हटलं जातं. याची प्रचितीही वेळोवेळी विविध माध्यमातून येतच असते. अशातच पुण्यातील 58 वर्ष जुनी असलेली डीपी रस्त्यावरील नामांकित सोसायटीनं सोसायटीच्या जागेत खवय्यांच्या होत असलेल्या अतिक्रमणामुळं एक मोठा निर्णय घेतलाय. चक्क सोसायटीच्या मोकळ्या जागेवरच बाऊन्सर नेमले (Pune Food Stall Bouncers) आहेत. त्यामुळं सोसायटीत असलेल्या हॉटेलमधून चहा, कॉफी तसेच विविध खाद्य पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांना महिला बाऊन्सरचा सामना करावा लागत आहे.

प्रतिक्रिया देताना नवीनकुमार जगरवाल आणि तेजस परचुरे (ETV Bharat Reporter)

बाऊन्सर ठेवण्याची पहिलीच घटना : सिंहगड रस्त्याजवळील डीपी रोडवर 35 एकरमध्ये 277 बंगले असलेली 'नवसह्याद्री सहकारी गृहनिर्माण' ही नामांकित सोसायटी आहे. या सोसायटीत काही दुकानं हे भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यात काही उपहारगृह, काही छोटे हॉटेल्स आणि पोस्ट ऑफिस भाड्यानं देण्यात आली आहेत. तरीही सोसायटीच्या मोकळ्या जागेवर या दुकानदारांनी अतिक्रमण केली आहेत. या ठिकाणी खवय्यांचीही गर्दी होत असल्यानं सोसायटीतील सभासदांना त्रास होऊ लागला आहे. याबाबत सोसायटीतील सभासदांनी मीटिंग घेत मोकळ्या जागेतील अतिक्रमण काढून चक्क बाऊन्सरच नेमले आहेत. यामुळं दुकानदार आणि सोसायटीतील वादाचा फटका ग्राहकांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात सोसायटीच्या मोकळ्या जागेत बाऊन्सर ठेवण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे.

दुकानदारांना नोटीस : 'नवसह्याद्री सोसायटी'नं आपल्या जागेत सहा दुकानं सोसायटीच्या सभासदांना दीर्घमुदतीच्या भाडेतत्त्वावर दिली आहेत. यापैकी एका दुकानात हॉटेल असून, तिथे विविध खाद्य पदार्थ विकले जातात. हे खाद्य पदार्थ खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दुकानांसमोरच्या मोकळ्या जागेतच नागरिक या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत असतात. तसंच या दुकानात आलेल्या नागरिकांकडून रस्त्यावरच वाहनेदेखील लावली जातात. याचा त्रास सोसायटीतील लोकांना होत असल्याच्या अनेक तक्रारी सोसायटीकडं आल्या होत्या. या तक्रारींनंतर सोसायटीच्या माध्यमातून या दुकानदारांना तीन ते चार वेळा नोटीस देखील पाठवण्यात आली. मात्र, कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्यानं महापालिकेला सांगून सोसायटीनं या दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण काढून टाकलं. तसंच तिथं बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. या बाऊन्सरच्या माध्यमातून ह़ॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोसायटीच्या जागेत थांबून दिलं जातं नाही. त्यामुळं ग्राहक आणि बाऊन्सर यांच्यात अनेकवेळा वाद होत आहेत. याचा फटका हा ग्राहकांसोबतच हॉटेल मालकांनाही बसत आहे.

अतिक्रमण हटवून बाऊन्सर नेमले : याबाबत सोसायटीचे अध्यक्ष नवीनकुमार जगरवाल म्हणाले की, "नवसह्याद्री सहकारी गृहरचना सोसायटीत असलेले १ ते ६ ही सर्व दुकानं नवसह्याद्री सोसायटीची आहेत. ती सोसायटीच्या सभासदांना दीर्घमुदतीच्या भाडेपट्ट्यानं दिली आहेत. त्यांनी त्यांचा व्यवसाय दुकानातूनच करावा, असा करार झाला आहे. दुकानांसमोरील मोकळी जागा ही संपूर्णपणे सोसायटीच्या मालकीची आहे, असं सांगण्यात आलं होतं. तसेच या मोकळ्या जागेत सभासद दुकानधारकांनी कोणतेही व्यवसाय करण्याचं करारात नमूद नव्हतं. पण येथे असलेल्या हॉटेलच्या माध्यमातून या मोकळ्या जागेत अतिक्रमण करण्यात आलं. त्यांना वारंवार नोटीस देऊनही ते काढण्यात आलं नाही. या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांमुळं तसंच त्यांच्या गाड्यांमुळं सभासदांना त्रास होऊ लागला. त्याबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या. असं असताना आम्ही अनेक नोटीस दिल्या. पण काहीही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ठराव मांडत अतिक्रमण हटवून तिथं आता बाऊन्सर नेमले आहेत."

बाऊन्सरमुळं व्यवसायावर परिणाम : सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर असलेल्या हॉटेलचे मालक तेजस परचुरे म्हणाले की, "आम्ही मान्य करतो की, ही मोकळी जागा सोसायटीच्या मालकीची आहे. पण मी एक 28 वर्षाचा युवक असून मी हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. आज पुणे शहरात आमच्या दोन शाखा आहेत. आम्ही आमच्या या हॉटेलच्या माध्यमातून पुणेकरांना चविष्ट पदार्थ देत आहोत. आम्ही चुकलो असल्याचं आम्ही मान्य करतो. पण अशा पद्धतीनं हॉटेलच्या समोरच बाऊन्सर ठेवून आमच्या येथे येणाऱ्या ग्राहकांना हे त्रास देत आहेत तर हे चुकीचं आहे. हे बाऊन्सर ग्राहकांना रस्त्यावर पाठवत असल्याने, आज आमच्या व्यवसायावर खूप जास्त परिणाम झाला आहे. जे पूर्वी दोन ते अडीच हजार ग्राहक दिवसाला येत होते, तेच आता या बाऊन्सरमुळं कमी झाले आहेत. दिवसाला आता फक्त 800 ते 1000 ग्राहकच येत आहेत. यामुळं याचा व्यवसायावर परिणाम झालाय. यामुळं सोसायटीनं यावर मार्ग काढून मराठी माणसाच्या व्यवसायाला साथ द्यावी."

हेही वाचा -

  1. बाऊन्सर नेमण्यापेक्षा पालिका आयुक्तांनी लोक प्रतिनिधींशी संवाद साधावा - भाजपा
  2. प्रॉपर्टी टॅक्सचा ग्राहकांनी पालिकेला टाकला मोठा 'बाऊन्सर'; तब्बल 892 चेक बाऊन्स, 38 जणांविरोधात खटला दाखल - BMC Property Tax
  3. गुरुग्राममध्ये बाऊन्सर्सची गुंडगिरी महिलेचा विनयभंग तुफान हाणामारी व्हायरल

Last Updated : Jun 16, 2024, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.