सोलापूर Accident In Solapur : जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयशरने सात महिलांना धडक (Eicher Hit Seven Women) दिल्यानं त्यातील पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.
पाच महिलांचा जागीच मृत्यू : कटफळ येथील काही महिला चिकमहूद येथील बंडगरवाडी येथे शेत मजुरीच्या कामासाठी गेल्या होत्या. कामावरून घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत त्या रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळेस कोळसा वाहतूक करणारा एक आयशर ट्रक समोरून आला. त्या ट्रक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं आयशर ट्रक थेट महिलांना येऊन धडकल्यानं हा भीषण अपघात घडला. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातातील सर्व महिला या कटफळ येथील रहिवासी आहेत. या अपघातानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
गावावरती पसरली शोककळा : अपघात झालेल्या आयशरमध्ये दोघेजण होते, त्यातील एक जण पळून गेला आहे. तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून पोलिस पुढील तपास सुरू आहे. एकाच गावातील पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -