मुंबई Social Media Friend Raped Girl : एका 13 वर्षांच्या मुलीवर सोशल माध्यमांवर भेटलेल्या मित्रानं गुजरातमध्ये नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मित्र तिला गुजरातला घेऊन गेला आणि बलात्कार केला. या प्रकरणी अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये वाकोला पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 21 वर्षीय नराधमाला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे.
गुजरातमध्ये नेऊन केला बलात्कार : पीडित बालिका आरोपीला सोशल माध्यमांवर भेटली होती. या नराधमानं पीडितेला अंधेरीतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 15 ऑगस्टला गावी घेऊन जातो असं सांगून तो तिला गुजरातला घेऊन गेला. गुजरातमध्ये आरोपीनं तिच्यावर आणखी तीन वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र ती स्वतःहून घरी परतली. परत आल्यावर ती शांत राहू लागल्यानं तिच्या वागणुकीत बदल झाला. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिची चौकशी केली, तेव्हा तिनं घडलेला प्रकार उघड केला.
हादरलेल्या नातेवाईकांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव : आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेनं सोशल माध्यमांवरुन त्याचा फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवला. त्यांनी त्या मुलाची ओळख पटवल्यानंतर पीडितेला वाकोला पोलीस ठाण्यात नेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वाकोला पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 नुसार तसेच अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो नराधम : आरोपी हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असून तो गोरेगाव परिसरात राहतो. त्यानं सोशल माध्यमातून पीडितेशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि बलात्कार केला. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "पीडितेच्या कुटुंबीयांनी सोशल माध्यमावरील फोटोवरुन नराधमाला ओळखलं आणि त्याला पोलीस ठाण्यात आणलं. पीडितेची कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपीनं 14 आणि 15 ऑगस्ट रोजी पीडितेवर बलात्कार केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."
हेही वाचा :