ठाणे Shopkeeper Attack On Customer : जर तुम्ही गरम समोसे, वडे, भजी खाण्याचे शौकीन (Thane Samosa News) असाल तर सावधान. कारण गरम समोसा मागवणे एका ग्राहकाला चांगलेच महाग पडले. मुंब्रा येथील रहिवासी जियाउद्दीन शेख ह्यांना गरमागरम समोसा खाण्याची इच्छा होतास त्यांनी मुंब्रातीलच आनंद कोळीवाडा येथील माजिद शेख नामक दुकानदाराकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर काय झालं वाचा....
दुकानदार आणि ग्राहकात बाचाबाची : जियाउद्दीन याने समोश्याची मागणी करताच दुकानदाराने त्यांना समोसा दिला. परंतु, समोसा थंड असलेला पाहताच जियाउद्दीन याने गरम समोसा देण्याची मागणी केली. त्यावर माजिद शेख याने खायचा असेल तर खा, नाहीतर निघ असं दटावलं. यावर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यानंतर जियाउद्दीन रागारागाने तिथून बाहेर पडला. दुकानदार माजिद शेख याचा राग थंड न झाल्यानं त्याने बाहेर जाणाऱ्या जियाउद्दीन याच्यावर मागून जाऊन धारदार शस्त्राने हल्ला चढवला.
ग्राहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत : हल्ल्यात जियाउद्दीन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ५ ते ६ टाके देखील पडले आणि कान देखील थोडा कापला गेला. याची तक्रार पोलिसात करताच पोलिसांनी भादंवी ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेची चर्चा सध्या ठाणे जिल्ह्यात सुरू आहे.
हेही वाचा :
- उत्तर पश्चिम (वायव्य) मतदारसंघातील लोकसभा निवडणूक निकाल पुन्हा चर्चेत, राहुल गांधींनी काय केली पोस्ट? - Maharashtra politics live updates
- खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune
- रेल्वे मंत्रालयानं "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये मिळवलं स्थान; केला 'हा' मोठा विक्रम - Limca Book of Records