ETV Bharat / state

काय तर म्हणे विद्यमान खासदाराविरुद्ध महापालिकेनं केली गैरसमजातून तक्रार! इओडब्ल्यूकडून कोणाकोणाला मिळाली क्लीन चिट - Ravindra Waikar

Ravindra Waikar : जोगेश्वरी येथील एका आलिशान हॉटेलच्या बांधकामात कथित अनियमितता केल्याप्रकरणी खासदार रवींद्र वायकर त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला.

Ravindra Waikar
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 10:29 PM IST

मुंबई Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) जोगेश्वरी येथील एका आलिशान हॉटेलच्या बांधकामात कथित अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. या अहवालात मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गैरसमजुतीतून रवींद्र वायकर यांच्या विरोधात तक्रार दिल्याचं म्हटलं आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून घडल्याबाबत जबाब पालिकेनं इओडब्ल्यूकडे नोंदवला असून आता आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी सांगितलं आहे.

काय होतं प्रकरण : रवींद्र वायकर हे सध्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव केला. एकेकाळी ठाकरेंच्या जवळचे असलेले वायकर यांनी याच वर्षी मार्चमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. वायकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडा केंद्र चालवण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सोबत करार केला होता. एफआयआरनुसार, ही परवानगी महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि काँग्रेस यांची युती असताना देण्यात आली होती. 2023 च्या सुरुवातीला हॉटेलच्या बांधकामासंदर्भात सार्वजनिक बागेसाठी आरक्षित भूखंड वापरण्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. ईओडब्ल्यूनं वायकर, त्यांची पत्नी मनीषा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यात गुरुवारी न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे, असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

आत्तापर्यंत कोणा-कोणाला क्लीन चिट मिळाली : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) एप्रिल 2022 मध्ये 52 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात भाजपा कार्यकर्ता मोहित कंबोज यांच्याविरुद्धचा फौजदारी खटला बंद केला होता. तसंच आर्थिक गुन्हे शाखेनं डिसेंबर 2022 मध्ये विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमधील आर्थिक अनियमिततेच्या 2015 प्रकरणात क्लीन चिट दिली होती. तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एप्रिल 2024 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही 25 हजार कोटी रुपयांच्या MSCB घोटाळ्यात क्लीन चीट दिली होती.

हेही वाचा :

  1. "दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायची बाकी", रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut
  2. खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट; जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यातून वायकर मुक्त - Ravindra Waikar Clean Chit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.