ठाणे BADLAPUR RAPE CASE : बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर बलात्काराच्या घटनेचं कव्हरेज करणाऱ्या महिला पत्रकारावर आगपाखड केलीय. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे", असं वक्तव्य त्यांनी केल्यानं पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
नागरिकांचा रेल्वे मार्गावर ठिय्या : बदलापूर येथील एका प्रसिद्ध शाळेत दोन मुलींवर आत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बदलापूर येथील शाळेबाहेर आज सकाळी साडेसहा वाजता पालकांसह नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडं वळवला. यावेळी आंदोलकांनी मुंबईकडं जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे मार्गावर ठिय्या दिला. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून पत्रकारांनीही हा मुद्दा उचलून धरलाय.
मी असं कोणतंही विधान केलेलं नाही. या प्रकरणात माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार हा शब्द वापरला होता. नेमकं काय झालं ते शोधण्याचं आवाहन मी पत्रकारांना केलं. पण त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. - वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष, शिवसेना (शिंदे)
महिला पत्रकाराशी बोलताना जीभ घसरली : बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, यांची महिला पत्रकाराशी बोलताना जीभ घसरलीय. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे", अशा शब्दात म्हात्रे यांनी महिला पत्रकारावर आगपखाड केली. त्यामुळं म्हात्रे यांचा सर्वत्र निषेध होत असून पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एका महिला पत्रकाराचा असा अपमान होत असेल तर, पत्रकारांनी दाद कुणाकडं मागावी, अशा भावना पत्रकार सोशल माध्यमांवर मांडत आहेत.
'हे' वाचलंत का :
- चिमुकलीवर शाळेत अत्याचार; बदलापूरमध्ये संतप्त जमावानं रेल्वेसेवा रोखली, आरोपीला फाशीची मागणी - Badlapur Girls Sexually Assaulted
- बदलापूर अत्याचार घटनेची सरकारकडून गंभीर दखल; शाळा मुख्याध्यापिका निलंबित, कठोर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश - Badlapur Girls Sexually Assaulted
- बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिले 'एसआयटी' चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री म्हणाले, "दोषींना सोडणार नाही" - SIT Probe In Badlapur Rape Case