बीड Kundlik Khande Arrested : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना रात्री जामखेड येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली होती. त्यांना माऊली खांडे यांच्या मारहाण प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आता बीड ग्रामीण पोलिसांनी (Beed Rural Police) ताब्यात घेतलं आहे. माऊली खांडे हे गावी जात असताना एप्रिल महिन्यात काहीजणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणात कुंडलिक खांडे यांना रात्री अटक करण्यात आली असून आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिलीय.
पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर : कुंडलिक खांडे यांच्यावर एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. परंतु आता व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर येत जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना अटक केली आहे. एव्हढेच नाही तर कुंडलिक खांडे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारातही सहभाग घेतला होता. परंतु तेव्हाही त्यांना अटक झाली नव्हती. आता या अटकेचा मुहूर्त पोलिसांनी शोधल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड : काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विधाने होती. यानंतर बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या तोडफोडीत खांडे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं होतं.
हेही वाचा -
- पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोयता गँगची दहशत : कोयत्यानं हल्ला करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, सात जणांना अटक - Koyta attack on traders
- तीन ड्रग्ज तस्करांना पुणे पोलिसांकडून अटक, एका नायजेरियन नागरिकासह पुण्यातील दोघांचा समावेश - Pune drug case
- नीट घोटाळा प्रकरण मास्टरमाईंड गंगाधर मुंडे आणि इराण्णा कोनगुलवार अटक, उद्या पहाटेपर्यंत लातूरला आणण्यात येणार - Neet Paper Leak Case