ETV Bharat / state

भाजपासाठी शिवसेनेनं केला मोठा त्याग, 'या' मतदारसंघातून घेतला उमेदवारी अर्ज मागं - Graduate Constituency Election - GRADUATE CONSTITUENCY ELECTION

Graduate Constituency Election : कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे आता महायुतीचे उमेदवार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 8:51 PM IST

मुंबई Graduate Constituency Election : लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन महायुतीत शेवटपर्यंत एकमत होत नव्हतं. त्यामुळं हाच प्रकार पुन्हा विधानपरिषद निवडणुकीत देखील दिसत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेनेसह भाजपानं अर्ज दाखल केले होते. मात्र, आज शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं आता कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचे (भाजपा) उमेदवार निरंजन डावखरे आहेत.

पक्षांकडून 3 अर्ज दाखल : विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेकडून संजय मोरे तर भाजपाकडून निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळं महायुतीत समन्वय नसल्याचं दिसून आलं. महायुतीतूनच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळं चांगलीच चर्चा रंगली होती. पण आज अखेरच्या दिवशी संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला आहे. तर काही दिवसांपूर्वी मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळं आता या मतदासंघात फक्त निरंजन डावखरे उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे.

महायुतीचा उमेदवार निवडून येईल : 'मी' आज अर्ज मागं घेतला आहे. मला पक्षाचा आदेश आल्यानं अर्ज मागं घेतला. पक्षाचा आदेश येईल, त्याचं मी पालन करणार आहे, असं पूर्वीच सांगितलंय. आमची इच्छा होती म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण जो महायुतीचा अंतिम निर्णय असेल, तो आम्हाला मान्य आहे. म्हणून महायुती धर्म म्हणून 'मी' माझा उमेदवारी अर्ज मागं घेतला', असं संजय मोरे यांनी सांगितलं. आमचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अर्ज मागं घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आम्ही या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देतोय. आता महायुतीकडून निरंजन डावखरे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील नेते, कार्यकर्ते शंभर टक्के काम करतील, असं संजय मोरे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. भाजपा अजित पवारांना सत्तेपासून दूर करणार; भाजपात आत्मचितंन सुरू - महेश तपासे - Ajit Pawar News
  2. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषण मागे घेण्याची फडणवीसांची विनंती - Manoj Jarange Patil
  3. मणिपूरबाबत भागवत बोलल्यानंतर आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Uddhav Thackeray On PM Modi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.