ETV Bharat / state

ठाकरे गटाच्या शाखेत चक्क शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; ठाकरेंचे कार्यकर्ते गैरहजर तरीही.... - Lok Sabha election 2024

Lok Sabha Election 2024 : शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. दोघेही टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शाखेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Naresh Mhaske
नरेश म्हस्के (ETV Bharat Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 9:54 PM IST

Updated : May 8, 2024, 10:09 PM IST

नरेश म्हस्के (ETV Bharat Maharashtra Desk)

ठाणे Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीत (Thane Lok Sabha) शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदेगट अशी लढत रंगली असून, प्रचार शिगेला पोहचला आहे. बुधवारी ठाण्यात महायुतीच्यावतीनं काढण्यात आलेल्या प्रचारफेरी दरम्यान शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी चक्क ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या चंदनवाडी शाखेत जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार केला.

ठाकरे गटाच्या शाखेत म्हस्केंचं स्वागत : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखेच्या मालकीवरून दोन्ही गटात राडा झाला होता. तरीही धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळातील चंदनवाडीची शाखा आजही ठाकरे गटाकडं असताना, येथे नरेश म्हस्कं यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे, या वेळी शाखेत ठाकरे गटाचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता.

ठाकरे गटाच्या शाखेत म्हस्केंचा प्रचार : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात लहानमोठ्या कारणांवरून ठिणग्या उडाल्या. शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरूनही अनेकदा वाद निर्माण झाले. यातील ठाण्यातील चंदनवाडी येथील शिवसेना शाखा आजही ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. ठाणे लोकसभेत म्हस्के यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे उमेदवार आहेत. याच शाखेतून राजन विचारे यांचा प्रचार केला जात आहे. तरीही बुधवारी महायुतीच्या प्रचार फेरी दरम्यान याच चंदनवाडी शाखेत शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नरेश म्हस्के यांनी शाखेत प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचं पेव फुटलंय.

भाजपानं सुरू केली प्रचार रॅली : ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात भव्य प्रचार फेरी काढून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मिनाताई ठाकरे चौकातून संजय केळकर यांच्या उपस्थितीत प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी, जागोजागी नरेश म्हस्के यांना औक्षण करीत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी 'जय श्रीराम, अबकी बार 400 पार' चा नारा दिलाय.

हे वाचलंत का :

  1. आमदार रवी राणांनी फुकटात नेल्या 70 हजार विटा; आमदारांवर अशी वेळ का आली? - Allegation On Ravi Rana
  2. उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज हातात...; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला - lok sabha election
  3. "वेगवेगळ्या मार्गाने कमावलेले कोट्यावधी रुपये कसे वाचवायचे, या भीतीनेच ..." संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - Kolhapur lok Sabha election 2024

Last Updated : May 8, 2024, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.