मुंबई Piyush Goyal : पुण्यात गेल्या रविवारी (21 जुलै) भाजपाचे एक दिवसीय शिबिर पार पडले होते. या शिबिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवारांनी अमित शाह हे तडीपार म्हणून सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. मग असा माणूस देशाचा गृहमंत्री कसा काय होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांच्या टीकेचा चांगला समाचार घेतला आहे.
यूपीए सरकारचं कारस्थान : अमित शाह यांना तडीपार करण्याचं कारस्थान हे यूपीए सरकारचं होतं. केंद्रात तेव्हा यूपीए सरकार होतं, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पलटवार केला आहे. तसेच त्यावेळी यूपीए सरकारच्या कटकारस्थानामध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही मोठा हात होता. त्यामुळे आता शरद पवारांनी जो आरोप, सवाल उपस्थित केलाय, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले.
शरद पवारांकडून गृहमंत्र्यांवर 'ही' टीका : "काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर ‘भ्रष्टाचाराचा सुभेदार’ असं म्हणत टीका केली. पण ज्यांनी ही टीका केली, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून तडीपार करण्यात आलं होतं. गुजरात दंगल प्रकरणी कोर्टानं तडीपार केलं, तो व्यक्ती आज देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतोय," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केली. तसंच "राजेश टोपे म्हणाले, माझं बोट धरुन ते राजकारणात आले. मात्र, त्यावर माझा विश्वास नाही. कारण नरेंद्र मोदी देखील असं म्हणाले होते. पण मला माझ्या बोटावर विश्वास आहे," असा खोचक टोलाही शरद पवार यांनी लगावला होता.
हेही वाचा :
- विधानसभेची 'मत'पेरणी! 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ'नंतर आता बळीराजासाठी आणली 'ही' योजना - CM Baliraja Free Power Scheme
- "माझ्यावर टीका करणारे गुजरातमध्ये तडीपार होते", शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल - Sharad Pawar on Amit Shah
- 'लाडकी बहीण' योजनेमुळं सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Majhi ladki Bahin Yojana