कोल्हापूर Sharad Pawar News : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी देशभर सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरवात केलीय. महाविकास आघाडीच्या सभाही महाराष्ट्रात सातत्यानं होत आहेत. जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. तर, काही जागांवर निर्णय होणं बाकी आहे. महाविकास आघाडी लवकरच त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर करणार आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून कोल्हापुरचे शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. अशातच न्यू पॅलेस येथे शाहू माहाराजांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानं राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
"आज कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील हे उपस्थित होते". - शरद पवार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
39 जागांवर महाविकास आघाडीचं एकमत : "लोकसभेच्या 48 जागांपैकी 39 जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार झाल्यास मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराजांना राजकारणापेक्षा समाजकारणात स्वारस्य आहे. कोल्हापुरातील जनतेनं आग्रह धरल्यास शाहू महाराजांच्या उमेदवारीचा मला आनंद होईल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी शाहू महाराज सहमत आहेत. शाहू महाराजांना राजकीय पक्षात प्रवेश करताना पाहिलं नसल्याचं" शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांची महायुतीवर टीका : "लोकसभेच्या 39 जागांवर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. दोन ते तीन जागांची चर्चा सुरू आहे. 'मी' सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून या जागांवर निर्णय घेईन. भाजपा देशात 400 पेक्षा जास्त जागांवर दावा करत आहे. तसंच राज्यात 40 पेक्षा जास्त जागांवर दावा भाजपानं केलाय. मात्र, भाजपा कमी जागा सांगत असल्याचा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे.
कोल्हापुरात घेतली भेट : पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, "येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. 'तो' पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमात मालोजीराजे, शाहू महाराज येणार होते. पण ते येऊ शकले नाहीत. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमाला जाणार होतो. त्यावेळी 'मी' त्यांना भेटायला हवं, असं सांगितलं. ते काल भेटले नाहीत. त्यामुळं आज कोल्हापुरात त्यांची भेट घेतली" देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं नाही. मराठा आरक्षणाची सुरुवात कोणी केली? त्यावर 'ते' उद्या बोलतील. त्यामुळं ते बोलल्यानंतरच मी याबाबत माझं मत मांडेन, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
हे वाचलंत का :