मुंबई MVA Protest In Mumbai : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात छत्रपती शिवराय यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोघंही वयाची परवा न करता मोर्चात सहभागी झाले. हे दोघं पायी चालल्याचं पाहून कार्यकर्त्यांनाही उत्साह आला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या बाजुला जात जोरदार घोषणाबाजी दिली.
शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज आंदोलनात : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मागील आठवड्यात मालवणमध्ये पुतळा कोसळला. या विरोधात आज महाविकास आघाडीनं मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया इथपर्यंत मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र शेवटच्या क्षणी आंदोलनाला परवानगी दिली. या मोर्चात महाविकास आघाडीनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं. आंदोलनाचा समारोप गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोघंही वयाची परवा न करता मोर्चात सहभागी झाले. या दोघांच्या सहबागामुळे कार्यकर्त्यांनाही उत्साह आला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. दरम्यान छत्रपती शाहू महाराजांची तब्येत ठीक नव्हती, तरीसुद्धा ते मोर्चात सहभागी झाले. यावेळी शरद पवार यांनी शाहू महाराजांचा हात पकडून मोर्चात चालणं पसंद केलं.
महाविकास आघाडीचं जोडो मारो आंदोलन : महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. काँग्रेस पक्षाचे खासदार छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं प्रयाण केलं त्यावेळी शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज सोबत चालू लागले. यावेळी शरद पवारांनी शाहू महाराजांचा हात पकडत तरुणांना लाजवेल अशाप्रकारे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं पावलं टाकले. यावेळी छत्रपती शाहू महाराज देखील शरद पवारांच्या हाताचा आधार घेत पटापट पावलं टाकत होते. गेटवे ऑफ इंडिया परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा जवळ आंदोलक आल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणं झाली.
महाराजांचा सरकारनं अवमान केलाय - छत्रपती शाहू महाराज : खासदार छत्रपती शाहू महाराज बोलताना यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं. मालवणमध्ये जे काय झालं ते सर्वांनी पाहिलं, खरंतर ते तसं घडायला नको होतं. या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. केवळ देशात नाहीतर देशाबाहेरही शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट आहे. शिवप्रेमी संतप्त झाला आहे. निश्चितच हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा पुतळा ज्यांनी तयार केलाय आणि यात जे दोषी असतील, त्यांना मोकळ सोडता कामा नये. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. महाराजांचा आदर आणि मान-सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. महाराजांचा या सरकारनं अवमान केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथं जमलोय, असं म्हणत छत्रपती शाहू महाराजांनी सरकारवर टीका केली.
हेही वाचा :