नाशिक Shantigiri Maharaj : लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अशात शांतिगिरी महाराज यांनी 2009 साली छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो आणि नावाचा वापर निवडणुकीत केला नव्हता. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव झाला होता. यंदा मात्र शहरात ठिकठिकाणी शांतिगिरी महाराज यांच्या कडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या फोटोचा देखील वापर करण्यात आला आहे. याला मात्र श्री जनार्दन स्वामी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी विरोध दर्शवत होर्डिंगवरील संत जनार्दन स्वामी महाराज यांचा फोटो तत्काळ काढावा, अशी मागणी केली आहे.
शांतिगिरी महाराज जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी नाही : स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असल्याचा अपप्रचार करत आहे. मात्र, स्वामी शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी नाहीत. श्री सद्गुरू जनार्दन स्वामी हयात असताना आयुष्यभर राजकारण, पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापासून दूर होते. शांतिगिरी महाराज यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे नाव आणि फोटो निवडणुकीच्या कामी वापरू नये. लोकसभेचा प्रचार करत असताना त्यांच्या प्रचार पत्रकावर जनार्दन स्वामींचा फोटो असून पत्रकावरील या फोटोमुळे जनार्दन स्वामींची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे प्रचार पत्रकावरील फोटोला आणि सद्गुरूंच्या नावाला आमच्या संस्थेच्या सर्व विश्वस्तांचा तसेच भक्त मंडळांचा सक्त विरोध आहे, असं मत संस्थेचे विश्वस्त दिलीप जोशी यांनी व्यक्त केलं आहे.
मग राजकारणाचे शुद्धीकरण कसे होणार ? : राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असं सांगून शांतिगिरी महाराज प्रचार करत आहे. पण काही महिन्यांपूर्वी तपोवनात झालेल्या धर्मसंस्कार सोहळ्याला रोज अनेक राजकीय पक्षांचे मंत्री, पुढारी, नेते यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा यांना राजकीय पुढारी हे 'अशुद्ध' आहे हे माहीत नव्हतं का? तो सोहळा फक्त स्वतःचं शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता का? मग शांतिगिरी महाराजांनी उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली? जर तुम्हाला राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असते तर अपक्ष निवडणूक लढवावी, असा सल्ला मंदिर श्री जनार्दन स्वामी महाराज संस्थेचे विश्वस्त अनंता पाचोरकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- Seat sharing of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं ठरेना, वाचा कुणाला पाहिजे कोणती जागा, कसा सुटणार तिढा
- ECI : लोकसभा निवडणुकीपूर्वी 'बीएमसी' आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पदावरुन हटवलं, नेमकं काय आहे प्रकरण?
- Ashok Chavan On Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं वक्तव्य हस्यास्पद : खासदार अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल