ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवारांचा कांदा आणि दुधानं केला घात; उत्तर महाराष्ट्रात इफेक्ट - Onion Milk Affect Election - ONION MILK AFFECT ELECTION

Onion Milk Affect Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन आता सरकारही स्थापन झालं. या निकालात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. आता हा पराभव कोणत्या कारणांमुळं झाला याचा अंदाज घेण्याचं काम सध्या सर्व नेते करत असतील. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या पराभवाचं कारण कांदा आणि दूध असल्याचं सांगितलं जात आहे. कसं ते घ्या जाणून....

Etv Bharat
फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 7:33 PM IST

Updated : Jun 11, 2024, 7:54 PM IST

शिर्डी(अहमदनगर) Onion Milk Affect Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर महाराष्ट्रातील आठ ठिकाणी महायुतीच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. शेतीमालाचे दर व विशेषतः कांदा आणि दूध हेच पराभवाचे किंग मेकर ठरले असल्याचं ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी सांगितलं.

माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर (ETV Bharat Reporter)

कांदा निर्यात बंदीचा फटका : गेल्या दोन-तीन वर्षात केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. कांद्याला भाव वाढले की केंद्र सरकार निर्यात बंद करते किंवा निर्यात मूल्य वाढवते. परिणामी भाव पडतात. यामुळं शेतकऱ्यांनी अनेक वेळा केंद्राकडं हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्रानं यात वेळ काढूपणा केल्यामुळं राज्यासह अहमदनगर, शिर्डी, येवला, लासलगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी, नांदगाव या भागातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला.

कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष : एवढेच नव्हे तर मागील चार-पाच महिन्यांत कांदा निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकऱ्यांतून भाजपा विषयी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असल्याचं दिसून आलं. मतदान करतेवेळी ईव्हीएम मशीनचे बटन कांद्यानं दाबून मतदान केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच मतदान करतेवेळी अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची गळ्यात माळ तसंच हातात दुधाची बाटली घेत मतदान केलं होतं. त्याचाच परिपाक म्हणून महायुतीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला, अशी जोरदार चर्चा आहे.

कांद्यामुळं उमेदवार पराभूत? : कांद्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर, शिरूर, सोलापूर, माढा या आठ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दिग्गज उमेदवारांना फक्त आणि फक्त कांद्यामुळंच पराभव पत्करावा लागला असल्याचं शिर्डीतील ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी पोहोचले मतदान केंद्रावर; नेमकं काय घडलं?
  2. कांद्यावरुन मोदींविरोधात तरुणांची भर सभेत घोषणाबाजी; पंतप्रधान मोदी मात्र उद्धव ठाकरेंवर बरसले

Last Updated : Jun 11, 2024, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.