ETV Bharat / state

बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन घेतलं मागे, तीन दिवसांनी घेतला निर्णय - BABA ADHAV HUNGER STRIKE

ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी 'आत्मक्लेश आंदोलन' सुरु केलं होतं.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 5:37 PM IST

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानं महविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे. असं असतानाच अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी 'आत्मक्लेश आंदोलन' सुरु केलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव हे आंदोलनाला बसले होते. त्यानंतर आज ( 30 नोव्हेंबर) बाबा आढाव यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर बाबा आढाव यांनी आंदोलन मागे घेतलं.

लोकशाहीचं वस्त्रहरण : "सरकारी पैशाची राज्यकर्त्यांकडून लूट सुरू आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पद्धतीनं पैश्यांचा वापर झाला आहे. निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात येत आहे. पुढं जाऊन सरकारच्या विरोधात सत्याग्रह देखील करणार आहोत. अदानीवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बाबा आढाव यांनी केलीय.

शरद पवारांनी घेतली भेट : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विाचरपूस केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, की "विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैश्यांचा महापूर याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. तो या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या मनात अस्वस्थता वाढली आहे. संसदेच्या बाहेर भेटलेल्या नागरिकांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. तसंच बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे लोकांच्या मनात समाधान आहे," असं यावेळी शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

  1. "ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज
  2. मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यांवरून अडलंय घोडं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवीत 'ही' खाती
  3. राज्यातील अनेक पराभूत उमेदवारांची व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी, काही उमेदवारांनी भरले शुल्क

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.