ETV Bharat / state

Seat sharing of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं ठरेना, वाचा कुणाला पाहिजे कोणती जागा, कसा सुटणार तिढा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 4:20 PM IST

Seat sharing of Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात आचारसंहिता लागू झाली असली तरी अद्याप राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. हा तिढा लवकरच सुटेल असं नेत्यांकडून सांगितलं जात असलं, तरी काही जागांवर अजूनही अडचणी असल्याचे नेते सांगत आहेत.

Code Of Conduct
आचारसंहिता लागू झाली

मुंबई Seat sharing of Mahavikas Aghadi : आमदार विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेवर अडून आहेत. त्यांनी ही जागा मिळवणारच असं सांगितलं आहे. तर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मात्र जागावाटप लवकरच जाहीर होईल, असं सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक 5 टप्प्यात घेतली जाणार आहे. उमेदवारी अर्ज लवकरच दाखल केले जाणार आहेत; मात्र तत्पूर्वी राज्यातील महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत अद्याप अडचणी कायम आहेत. येत्या एक दोन दिवसात जागावाटप यादी जाहीर होईल, असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात काही जागांबाबत नव्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत.

काय ठरले आहे जागा वाटपाचे सूत्र - लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र जवळपास निश्चित झालं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा काँग्रेसला 16 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सामील करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही चार जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडीने केला आहे; मात्र या जागा कोणत्या याबाबत अद्याप निश्चिती झाल्याचं दिसत नाही.

कोणत्या पक्षाकडे जाणार कोणत्या जागा : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडे नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई या जागा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे रायगड, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, रत्नागिरी, जळगाव, मावळ, शिर्डी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, बुलडाणा, हातकणंगले, यवतमाळ, दक्षिण मुंबई, सांगली, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर ईशान्य मुंबई आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे दिंडोरी, शिरूर, बारामती बीड, रावेर, माढा, अहमदनगर, सातारा, भिवंडी, वर्धा या जागा जाण्याची शक्यता आहे.

'या' जागांवरून अजूनही तिढा : सध्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी पक्षाला दिल्या जाणाऱ्या जागांबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, रामटेकची जागा काँग्रेसला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगली जागांसाठीही पेच निर्माण झाला आहे. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना लढवण्यासाठी काँग्रेसकडे देण्यात येणार आहे. तर त्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना गटाला दिली जाणार आहे. मात्र, सांगलीमध्ये काँग्रेसची जय्यत तयारी सुरू असून सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आग्रही आहेत. या जागेवर अन्य कोणीही घटक पक्षातील नेत्यांनी दावा करण्याजी गरज नाही, असंही कदम म्हणाले. ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आपण महाविकास आघाडीकडे मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित : यासंदर्भात बोलताना कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही सांगलीसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, असं सांगितलं आहे. दरम्यान या जागेवरून चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची जवळपास उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे या जागेचाही तिढा कायम आहे. या जागांवरील तिढा सोडवत लवकरच महाविकास आघाडी जागावाटप जाहीर करील, असं महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सांगितलं. जागांबाबत फारशा अडचणी नाहीत. थोडीफार तडजोड करावी लागणार आहे, ती प्रत्येक पक्ष करायला तयार आहे. त्यामुळे लवकरच जागावाटप जाहीर केले जाईल, असेही सावंत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Pandharpur Temple News: बुलेट प्रुफ काचेमध्ये पंढरीचा विठ्ठल उभा राहिला! मुर्तीचं संरक्षण करण्याकरिता काम सुरू
  2. Exams of Uneducated Persons : शाळाही न पाहिलेल्या निरक्षर लोकांनी दिली परीक्षा
  3. Lok Sabha Election 2024 : तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचा राजीनामा, तामिळनाडूतून लोकसभा लढवण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.