ETV Bharat / state

भरधाव ट्रकनं चिरडल्यानं शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर, ट्रकचालक फरार - Accident near Bhiwandi - ACCIDENT NEAR BHIWANDI

Bhiwandi Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा ट्रकखाली चिरडून जागीच एकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:37 PM IST

ठाणे Bhiwandi Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा ट्रकखाली चिरडून जागीच तडफडून मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील खारबाव गावच्या हद्दीतील फिरींगपाडा इथं घडलीय. घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय. या अपघाताची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे फरार ट्रक चालकाचा शोध सुरु केलाय.

कसा घडला अपघात : मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगा सातव्या इयत्तेत शिकत असून त्याचा मित्र दहाव्या इयत्तेत शिकत आहे. यातील दहाव्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलाचं मुळ घर हा भिवंडी तालुक्यातील फिरिंग पाडा इथं असल्यानं तो मित्रासोबत आजी-आजोबांसाठी काही सामान घेऊन जात असताना सदर अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (आज) गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मयत आणि त्याचा मित्र हे दोघं खारबाव गावातून ॲक्टिव्हा दुचाकीवरुन फिरींगपाड्याच्या दिशेनं कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी खारबावच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रक चालकानं त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीनं व वाहतुकीच्या नियमांकडं दुर्लक्ष करुन दुचाकीला जोरात ठोकर दिली. या अपघातात दोघंही मित्र चिरडले गेले. त्यात सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झालाय.

पोलीस तपास सुरु : दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरता भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय. तर जखमी मुलाची प्रकृती गंभीर असून त्यास उपचारासाठी अंजूर फाटा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या साहाय्यानं त्याचा शोध सुरु केलाय. या अपघाताप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंची बस दरीत कोसळली; 21 भाविकांचा अंत, अनेकजण गंभीर - Accident in Jammu
  2. भरधाव कारनं 4 वाहनांना उडवलं; एका मुलीचा मृत्यू, थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद! - Car Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.