ETV Bharat / state

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या - Larvae Found In Millets Chocolate - LARVAE FOUND IN MILLETS CHOCOLATE

Larvae Found In Millets Chocolate : अमरावतीच्या मेळघाटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. मेळघाटातील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळं प्रशासन चिमुरड्यांच्या जीवाशी खेळतंय का? असा संतप्त सवाल पालकांनी विचारला.

Zilla Parishad School Amravati
चॉकलेटमध्ये आढळून आल्या आळ्या (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 9:52 PM IST

अमरावती Larvae Found In Millets Chocolate : मेळघाटातील गडगाभांडुप गावातील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) विद्यार्थ्यांसाठी आलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये (Millets Chocolate) अळ्या (larvae) आढळून आल्यानं खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात शाळेत येऊन तक्रार केली असून, हा प्रकार आमच्या पाल्यांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा रोष देखील पालकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया देताना शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने (ETV BHARAT Reporter)

असा आहे प्रकार? : मेळघाटातील विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या वतीनं शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. याचाच एक भाग म्हणून मुलांना मिलेट्स चॉकलेट देखील दिले जाते. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिलेट्स चॉकलेट वाटण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे चॉकलेट आपल्या घरी नेले असताना चॉकलेटवरील कवर उघडताच त्यातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या. हा प्रकार पाहताच पालकांनी थेट शाळेत धाव घेतली. शाळेतील शिक्षकांना या संदर्भात माहिती देण्यात आली. शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मिलेट चॉकलेट पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी देखील पालकांनी केली.

चॉकलेट वाटप थांबवलं : शुक्रवारी मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये चॉकलेटचे वितरण करण्यात आलं. ते चॉकलेट मार्च महिन्यात आलं होतं. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना याचे वितरण झाले नाही. आता या चॉकलेटचं वितरण करण्यात आलं. मात्र, त्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्यामुळं मेळघाटात खळबळ उडाली. मेळघाटातील शाळांमध्ये चॉकलेटचे वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी दिली.

हेही वाचा -

  1. बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा गावकऱ्यांसह शिक्षकांनी केली पुन्हा सुरू, शाळेनं पटकवला प्रथम क्रमांक - Zilla Parishad School
  2. 'झेडपी'ची पोरं लय भन्नाट; कोडिंगचा वापर करून बनवलं ॲप, गेम अन् अ‍ॅनिमेशन
  3. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळा अंधारात; जिवती तालुक्यातील 37 शाळांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.