ETV Bharat / state

मादागास्करपासून भारत विभक्त होऊन झाली 'सौराष्ट्र खोऱ्याची निर्मिती'; आयआयटी अभ्यासातील निष्कर्ष - Paleography Study In IIT

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 7:53 PM IST

Paleography Study In IIT : सुमारे 100 दशलक्ष वर्षांपूर्वी मादागास्कर पासून भारत वेगळा झाला आणि पश्चिम गुजरात तसंच मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर पसरलेल्या 'सौराष्ट्र खोऱ्याची निर्मिती' झाली, असा निष्कर्ष सध्या सुरू असलेल्या आयआयटीच्या एका अभ्यासामध्ये पुढे आला आहे.

Paleography Study
सौराष्ट्र खोऱ्याची निर्मिती (Source AI)

मुंबई Paleography Study In IIT : सौराष्ट्र खोऱ्यातील गाळाचा हा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे यांनी तिरुअनंतपुरम येथील नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज (NCESS) सोबत संयुक्तपणे प्रदेशाच्या पॅलिओग्राफीची माहिती मिळवण्यासाठी केलाय. पॅलिओग्राफी हा एक ऐतिहासिक अभ्यास आहे. जो भूतकाळात पृथ्वीचे भाग कसा दिसायचा हे सांगतो. या अभ्यासाचं उद्दिष्ट म्हणजे या प्रदेशाच्या भूगर्भीय इतिहास समजून घेणे आणि खोऱ्यातील खनिजांचा अधिक शोध घेणे हा आहे. पश्चिम गुजरात आणि मुंबईच्या उत्तरेकडील 2,40,000 चौरस किमी किनारपट्टीवर पसरलेल्या या सौराष्ट्र खोऱ्यानं समुद्र आणि जमिनीचा मोठा भाग व्यापला आहे.

सौराष्ट्र खोऱ्याची निर्मिती : येथील बहुतांश भूभाग डेक्कन ट्रॅप्स नावाच्या ज्वालामुखीच्या खडकांमध्ये सामावला गेला आहे. 66 दशलक्ष वर्षांपूर्वी क्रेटेशियस काळात पश्चिम घाटावर ज्वालामुखीचा उद्रेक निर्माण झाला होता, असं अभ्यासात म्हटलंय. ज्वालामुखीय राख आणि खडकांच्या खाली असलेला गाळ यामुळं भारतीय उपखंडाचा सहस्राब्दी वर्षाचा प्रवास लपला जातो. सुमारे 100 दशलक्ष वर्षांपूर्वी भारत मादागास्करपासून वेगळा होऊन 'सौराष्ट्र खोऱ्याची निर्मिती' झाली. वेगळे होण्यापूर्वी भारत, मादागास्कर आणि सेशेल्स एकत्र जोडलेले होते.
वेगळे झाल्यानंतर भारताचा पश्चिम किनारा सखल प्रदेश बनला, तर उत्तरेकडील आणि उत्तर पूर्वेकडील भाग पर्वत रांगांमध्ये परावर्तित झाला, असं आयआयटी बॉम्बेच्या भूविज्ञान विभागातील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. पवन कुमार रजक यांनी सांगितलंय.

पश्चिम किनारपट्टीमध्ये हायड्रोकार्बन संसाधनांचे मोठे स्रोत : सौराष्ट्र खोरे कम्बे, कच्छ आणि नर्मदा या खोऱ्यांना मिळून तयार झालेल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये हायड्रोकार्बन संसाधनांचे मोठे स्रोत आढळून येतात. या गाळांचे मूळ जाणून घेतल्यास संसाधनांचं व्यवस्थापन करणं अधिक सोयीचं ठरू शकेल. त्यामुळं या भागातील पॅलिओग्राफी बदल आणि स्रोत यांचा अभ्यास करण्यासाठी या भागात अजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळं आपली समज अधिक सखोल होऊ शकेल. मादागास्कर आणि सेशेल्समध्ये देखील गाळ आला की नाही, हे आपण तपासलं पाहिजे, असं मत आयआयटी बॉम्बेचे भूवैज्ञानिक प्रा. शंतनू बॅनर्जी यांनी व्यक्त केलय.

अरबी समुद्रातील गाळ शोधून काढण्याची योजना : अभ्यास क्षेत्रासाठी भूकंपाचा डेटा मिळविण्यासाठी बेसिन कॉन्फिगरेशन आणि अरबी समुद्रातील गाळ शोधून काढण्याची योजना आखण्याबाबत आम्ही तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाशी (ओएनजीसी) संपर्क साधणार आहोत, असं बॅनर्जी म्हणाले. भूगर्भीय शक्तीमुळं लँडस्केप कसे विकसित झाले आणि कालांतराने त्याचा आकार कसा बदलला हे समजून घेण्यासाठी ही सिस्टीम महत्त्वपूर्ण आहेत. भविष्यात या अभ्यासातील निष्कर्षांमुळं प्राचीन नदी प्रणालीच्या मार्गांवर अधिक प्रकाश टाकला जावू शकेल असा विश्वास, या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, कुठे आहे भूकंपाचं मुख्य केंद्र? - Earthquake In Sangli
  2. हिंगोलीत चार वर्षात भूकंपाचे 25 धक्के; भूकंपामुळं नासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हादरे? - NASA Ligo LAB Project
  3. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे बसल्यानं नागरिकांची पळापळ, 'या' जिल्ह्यात आहे मुख्य केंद्र - EARTHQUAKE IN HINGOLI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.