ETV Bharat / state

सातारा जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'; कोयना धरणातील पाणीसाठा 'पन्नाशी' पार - Red Alert For Rain In Satara - RED ALERT FOR RAIN IN SATARA

Red Alert For Rain In Satara : सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर जास्त असल्यान कोयना धरणातील पाणीसाठा ५२ टीएमसीवर पोहचला आहे. दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.

Satara Weather Update
पावसाचा 'रेड अलर्ट' (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 10:27 PM IST

सातारा Red Alert For Rain In Satara : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने ५० टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. तसेच सातारा जिल्ह्यात पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं (Red alert for Rain in Satara) वर्तवला आहे.

कोयना धरणातील पाणीसाठ्याची पन्नाशी : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा पन्नाशीपार गेला आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणात प्रतिसेकंद ४० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान कोयनानगरमध्ये ५६ मिलीमीटर, नवजा येथे ६४ मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट : सातारा जिल्ह्याच्या काही भागात पुढील चोवीस तासात अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळं नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन मंत्रालयातील नियंत्रण कक्षानं केलं आहे.

गतवर्षीपेक्षा धरणात १५ टीएमसी पाणी जादा : कोयना धरणात मागील वर्षी आजच्या दिवशी (दि.२० जुलै) ३७.३६ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, तर पाण्याची आवक प्रतिसेकंद ७४ हजार क्युसेक एवढी होती. यंदा धरणात ५२.१५ टीएमसी एवढा पाणीसाठा असून प्रतिसेकंद ४० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईत पावसाची विश्रांती मात्र रेड अलर्ट कायम; जाणून घ्या लोकलचे अपडेट काय? - Mumbai Rain
  2. राज्यात मान्सूनचा धुमाकूळ; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट - Maharashtra Rain News
  3. Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफच्या 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.