सातारा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवडे टोलनाक्यावर तपासणी दरम्यान ५ कोटींचं सोनं आणि ६० किलो चांदीचा समावेश आहे. ही कारवाई FST पथक, GST अधिकारी, आयकर अधिकारी, तहसीलदार आणि कराड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. जप्त ऐवजाच्या तपासणीमध्ये ९ किलो सोने आणि ६० किलो चांदी असल्याचे आढळून झाले. त्याची अंदाजे किंमत ७ कोटी ५३ लाख रुपये आहे.
सध्या आयकर विभागाकडून इनवाइसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली ठेवले आहेत. जप्त ऐवज तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी कराड उत्तर FST पथकाने घेतली आहे.
तासवडे टोलनाक्यावर सापडलं घबाड- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवडे टोलनाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. रविवारी रात्री कोल्हापूरकडून मुंबईकडे निघालेल्या कारचा संशय आल्यानं पोलिसांनी त्या कारची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी कारमध्ये सोनं आणि चांदी मिळून ५ कोटींचं घबाड सापडलं. तळबीड पोलिसांनी संबंधित कार, सोनं आणि चांदी ताब्यात घेतली. सध्या प्राप्तिकर विभाग आणि जीएसटी विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती तळबीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
सोनं-चांदी बड्या व्यापाऱ्याची असल्याची चर्चा- टोलनाक्यावर कारमध्ये सापडलेलं सोनं आणि चांदी ही राज्यातील बड्या सोने व्यापाऱ्याची असल्याची चर्चा आहे. सध्या कारसह सोनं आणि चांदी तळबीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिल्यानंतर प्राप्तिकर आणि जीएसटी विभागाचे अधिकारी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाले. नेमकं सोनं कुणाचं आहे? हवालामार्गे त्याची तस्करी केली जात होती का? खरेदी रीतसर आहे का? याची सध्या चौकशी सुरू आहे.
पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातही मोठी कारवाई- मागील पंधरा दिवसांपूर्वी मुंबईहून तस्करी करुन आणलेले ४ कोटी ४७ लाख रुपयांचे सहा किलो सोने पुण्यातील तळेगाव टोलनाक्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकानं जप्त केले होते. तस्करी करून आणलेलं सोनं बसने पुण्यात नेलं जात होतं. औषधी कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी भरून संशयितांकडून सोन्याची तस्करी केली जात असल्याचं तपासात उघडकीस आलं होतं. नुकतेच पुण्यात १३८ कोटींचे सोने असलेला कंटेनरही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणातही पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे.
हेही वाचा