ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष, अत्याचाराच्या घटनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Devendra Fadnavis

Sanjay Raut On Devendra Fadnavis : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 12:30 PM IST

मुंबई Sanjay Raut On Devendra Fadnavis : काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नव्हती. भाजपाची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी त्यांनी मविआकडून नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात जनतेनं त्यांना पाठिंबा दिला. एवढ्या लवकर सोडून जातील, असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कुंटुबाच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनावर दिली. तसेच भाजपाला काही काम नाही, भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष आहे. अत्याचाराच्या घटनेवर भाजपा बनावट प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

नैतिकतेच्या ढोंगी गप्पा : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "या सरकारच्या काळात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांमध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यांना याबाबत प्रश्न विचारले की, मग ते बनावट प्रश्न निर्माण करतात. भाजपाचे कार्यकर्ते पगारी नोकरदार आहेत. त्यांचे आयटी सेल, झेंडे फडकवणारे ही सगळी लोकं त्यांचे पगारी नोकरदार आहेत. मग ते महाविकास आघाडी संदर्भात पूर्णपणे बनावट आणि खोटी भूमिका घेतात. यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर थेट अत्याचाराचे आरोप आहेत. त्याबाबत मविआ सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये बसले आहेत. देवेंद्र फडणवीसांना त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हाकलपट्टी करावी. उगाच नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारु नका, असा निशाणा संजय राऊतांनी भाजपावर साधला.

ठाकरे कुटुंबावरील टीकेवरुन राऊतांची सारवासारव : विरोधकांकडून ठाकरे कुंटुबाला लक्ष्य केलं जात आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावात महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषण ठोकून गेले. पण तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात जे मंत्री बसलेले आहेत, त्यांच्या संदर्भात न्याय करा. संजय राठोड या मंत्र्यामुळं एका महिलेनं आत्महत्या केली आहे. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, संजय राठोड यांच्या विरोधात सर्व पुरावे आहेत. मग ते पुरावे गेले कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा : "पुण्यात पोलिसांवर कोयता गँगनं हल्ला केलाय. हा हल्ला पोलिसांवर नसून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था माती खात आहे. महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले होतात. राज्यात कायद्याचा धाक नाही. महिलांवर, पोलिसांवर हल्ले होताहेत. त्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली. पोलीस सुरक्षित नाहीत. ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारताहेत. त्यांचे हवालदार, खाकी वर्दीचे लोकं सुरक्षित नाहीत आणि आम्हाला सांगतात, आम्ही तुमचं रक्षण करू. लाडक्या बहिणीचं रक्षण करु, पण सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यात अपयशी ठरलेत. पुण्यात अमली पदार्थ आणि गैरकृत्याचा सुळसुळाट सुरु आहे. ललित पाटील प्रकारणात खरा सूत्रधार कोण आहे आपण पाहिलेलं आहे. हप्ते कुठपर्यंत जात होते हे पाहिले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सगळी व्यवस्था, यंत्रणा कशी विकली गेली, हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का? पुण्याचे पालकमंत्री काय करतात? पालकमंत्री सध्या गुलाबी कपड्यात फिरताहेत. पण पोलिसांच्या डोक्यावर कोयत्याचे वार होत आहेत. ते रक्त मात्र लाल आहे. देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्याच्या काळात या खात्याची इतकी दुरावस्था कधीच झाली नव्हती," असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

कंगनाची चौकशी झाली पाहिजे : अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ":कंगनाला फारसं गांभीर्यानं तुम्ही घेऊ नका, आम्हीही तिला फारसं गांभीर्यानं घेत नाही. परंतु जे तिनं वक्तव्य केलं आहे. त्याची चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी तिचं रितसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे. त्या स्टेटमेंटवर आम्ही पार्लमेंटमध्ये चर्चा करू," असं राऊत म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकप्रिय योजना सरकारकडून आणल्या जाण्याची शक्यता असल्याचंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. "महिलांना आधी सुरक्षा द्या अन् नंतर त्यांना..."; पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Lakhpati Didi
  2. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest
  3. जनतेचा सरकारवर विश्वास नाही, म्हणून बदलापुरात जनतेचा आक्रोश आणि उद्रेक - संजय राऊत - Sanjay Raut on Badlapur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.