ETV Bharat / state

ईव्हीएम कंपनीच्या संचालकपदी भाजपाचे 4 डायरेक्टर; संजय राऊतांचा मोठा दावा - खासदार संजय राऊत

Sanjay Raut Slams BJP : चंदीगड महापालिका निवडणूक निकालावरुन राजकारण तापलं असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरुन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केलीय.

Sanjay Raut Slams BJP
Sanjay Raut Slams BJP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 12:56 PM IST

मुंबई Sanjay Raut Slams BJP : शिवसेना ठाकरे गटाचे नेता खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय. ईव्हीएमवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका करत ईव्हीएम कंपनीच्या संचालकपदी भाजपाचे 4 डायरेक्टर विराजमान असून 2024 च्या निवडणुकीत ईव्हीएमचा चमत्कार दिसून येणार असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. उत्तरप्रदेश आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेवरुन संजय राऊत यांनी हे आरोप लावले आहेत. त्याचबरोबर चंदीगडमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाचा महापौर विराजमान झालाय, ते पाहता 'चंदीगड पॅटर्न' 2024 च्या निवडणुकीतसुद्धा वापरला जाईल, असंही ते म्हणाले.

हा ईव्हीएम मशीनचा काय खेळ आहे? : मुंबईत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील चंदवली इथं एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन मिळाल्या, त्या जप्त केल्या. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमधून 300 पेक्षा जास्त इव्हीएम मशीन मिळाल्या. तो ट्रकसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतशा अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन पकडल्या जात आहेत, हा काय खेळ आहे? ईव्हीएम मशीन बनवणारी जी सरकारी कंपनी आहे, भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. अत्यंत गुप्त पद्धतीनं तिथं काम केलं जातं. तिथं आतापर्यंत कधीही राजकीय हस्तक्षेप नव्हता. संरक्षण विषयांतर्गत सुद्धा अनेक काम तिथं केली जातात. परंतु, आता या कंपनीमध्ये 4 डायरेक्टर हे भाजपाचे बसवले आहेत. ईव्हीएम मशीन साठी जो कोड लागतो तो सुद्धा तिथं बनवला जातो. या डायरेक्टरमध्ये जास्त डायरेक्टर हे गुजरात मधील आहेत. 2024 ची निवडणूक कशा पद्धतीनं लढवली जाईल त्याची ही तयारी आहे. दोन पॅटर्न व दोन फॉर्म्युले आहेत. एक मनसुखभाई फॉर्म्युला ते ईव्हीएम चे डायरेक्टर झाले व दुसरा चंदीगड फॉर्म्युला आहे."

ईव्हीएम हटी भाजपा गई : संजय राऊत पुढं म्हणाले की, "या देशात भारतीय जनता पार्टी सरळ निवडणुकीच्या मार्गानं किंवा लोकशाहीच्या मार्गानं निवडणूक जिंकू शकणार नाही. 'ईव्हीएम हटी भाजपा गई. ईव्हीएम है तो मोदी है.' आपण काल पाहिलं असेल, दोन गोष्टी या देशात अत्यंत वाईट पद्धतीनं घडल्या ज्या देशाच्या लोकशाहीला व परंपरेला कलंकित करणाऱ्या आहेत. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचे 20 हे पूर्ण बहुमत होतं. भाजपाचे फक्त 14 नगरसेवक होते. मतदान हे आप व काँग्रेसच्या बाजूनं झालेलं असताना सुद्धा त्या पिठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीनं आप आणि काँग्रेसची 8 मतं अवैध ठरवली. ज्या पद्धतीनं राज्यात राहुल नार्वेकर यांनी आमची मतं बाद ठरवली तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न तिथं वापरण्यात आला. विजयी होत असलेल्या आप आणि काँग्रेसच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाच्या महापौराला विजयी केलं. हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पार्टीने आणला आहे. हा 2024 च्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा वापरला जाणार आहे. मनसुख भाईआणि चंदीगड पॅटर्न हेच २०२४ च्या निवडणुकीमध्ये वापरले जाणार आहेत. अशा पद्धतीनं हजारो ईव्हीएम मशीन कशा प्रकारे सापडल्या जात आहेत."

700 तास चौकशीसाठी तयार : मंगळवारी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी कडून 7 तास चौकशी झाली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ते आमच्यावर फार दबाव आणत आहेत. आम्ही असं करु, तसं करु. परंतु आम्ही तुम्हाला जसा पलटू राम हवा आहे तसं होणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेतील सर्व घोटाळेबाज भारतीय जनता पार्टीत किंवा शिंदे गटात सामील झाले आहेत. आमची 700 तास चौकशी झाली तरी आम्ही चौकशीसाठी तयार आहोत."

प्रचारासाठी मोदींना यावं लागतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात वारंवार यावं लागेल. कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला आणि त्यांची जी काही तथाकथित महायुती आहे लोकसभेच्या चार जागाही ते जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना वारंवार या ठिकाणी प्रचारासाठी यावं लागतंय. मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी नाही तर प्रचारासाठी येत असतात. त्यांना प्रचार करु द्या."

हेही वाचा :

  1. "हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. रामाचं राज्य असतं तर, मराठ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती; संजय राऊतांचा टोला
  3. 'वंचित' महाविकास आघाडीसोबत; 48 जागांवर एकत्र लढण्याचा निर्धार, पुढील बैठक 30 जानेवारीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.