नागपूर Sana Khan Murder Case : भाजपाच्या नेत्या सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी रक्ताचे स्टेन आढळून आले होते. त्यात सना खान शिवाय आणखी दोघांच्या रक्ताचे डाग असल्याची माहिती समोर आलीय. हे रक्ताचे स्टेन एक महिला व पुरुषाचे आहेत. त्यामुळं सना खानचा मारेकरी अमित साहू आणि सना खान यांच्या व्यतिरिक्तही एक पुरुष आणि एक महिला त्या ठिकाणी उपस्थित होते का? असा प्रश्न निर्माण झालाय.
ती मोलकरीण सापडली : भाजपा नेत्या सना खान हत्या प्रकरण देशभर गाजलेलं आहे. सना खान या भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या नेत्या होत्या. गेल्या वर्षी 2 ऑगस्टला सना खान यांची मध्यप्रदेशच्या जबलपूर इथं हत्या झाली होती. 2 ऑगस्टच्या सकाळी मुख्य आरोपी अमित साहू यानं सना खानची बेसबॉल बॅटनं वार करून हत्या केल्यानंतर सना खान यांचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिला होता. मात्र, त्यापूर्वी अमित साहू याच्या घरी आलेल्या एका मोलकरीणनं सना खान यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि कार्पेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह पाहिला होता. तिनं ही बाब पोलिसांना सांगितली होती. मात्र, त्यानंतर ती मोलकरीण बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना ती मोलकरीण सापडली असून तिला आता जबलपूर इथून नागपुरात आणण्यात आलंय.
सना खानची हत्या जबलपूर येथील ज्या घरी झाली, त्या ठिकाणी आणखी दोघांच्या रक्ताचे डाग आढळून आल्यानं या प्रकरणात आरोपीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. नव्यानं आढळून आलेले रक्ताचे डाग कुणाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी आरोपी अमित साहूच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची रक्त चाचणी सुरू केलीय. यात आरोपी अमितच्या कुटुंबियांसह इतरांचाही समावेश आहे - राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर
घटनास्थळी दोन व्यक्तीच्या रक्तांचे डाग : सना खान हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहूच्या जबलपूर येथील घरी तपास करताना नागपूर पोलिसांना अमित आणि सना खान यांच्याशिवाय इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले आहेत. पोलिसांनी त्या रक्ताची डीएनए चाचणी केली असून ते रक्त सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त व्यक्तीचं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं हत्येची घटना घडली तेव्हा आणखी कोणी उपस्थित होते का? असा प्रश्न निर्माण झालाय.
हेही वाचा :