ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरणात रोहित गोदाराला बनवले सहआरोपी - Salman Khan House Firing Case - SALMAN KHAN HOUSE FIRING CASE

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात रोहित गोदारा यालाही सहआरोपी बनवण्यात आलंय. त्याचा संबंध अनमोल बिष्णोई यांनी रफिक चौधरीशी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे रोहित गोदारालाही मोक्का कायद्यान्वये सलमान खान गोळीबार प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आले आहे.

Salman Khan House Firing Case
सलमान खान गोळीबार प्रकरण (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 11:14 AM IST

मुंबई - Salman Khan House Firing Case : अनमोल बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रँचने रोहित गोदारालाही सलमान खानच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी बनवले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक सरदार चौधरी हा रोहित गोदाराच्या संपर्कात होता. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गोदारा आणि अनमोल बिष्णोई यांनी रफिक चौधरीशी एकत्र बोलणं केलं होतं. या लोकांनी संवाद साधण्यासाठी सिग्नल अ‍ॅपचा बहुतांश वेळा वापर केला होता.

आरोपी मोहम्मद रफिक सरदार चौधरीनं 12 एप्रिल रोजी बनवलेला व्हिडिओ आज अटक करण्यात आलेल्या सहाव्या आरोपी हरपाल सिंग उर्फ हॅरीसह अमनोलला पाठवण्यात आला होता, असं असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरपाल सिंगचा थेट संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आहे. याआधी रायपूरमधील एका गोळीबार प्रकरणादरम्यान हरपाल सिंगच्या हातात गोळी लागली होती, ज्याची पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर शेअर देखील केली होती.

हरपाल सिंग 38 वर्षांचा असून तो हरियाणातील सिरसा जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो गेल्या चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगशी जोडला गेलेला आहे. राजस्थान, हरियाणा आणि बिहार येथे बिष्णोई गँगचा प्रभाव असून हरपाल सिंग हा सतत अनमोल बिष्णोई याच्या सिग्नल आणि टेलिग्राम अँपवरून संपर्कात होता. तसेच हरपाल सिंग हा बिष्णोई गँगमध्ये तरुणांना भरती करण्याचं काम देखील करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच मोहम्मद रफिक सरदार चौधरी हा आरोपी अनमोल बिष्णोई आणि रोहित गोदारा यांच्यासोबत एकत्रित संपर्कात असल्याने आता रोहित गोदारालादेखील मोक्का कायद्यान्वये सलमान खान गोळीबार प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आले आहे.

हेही वाचा -

घाटकोपर दुर्घटनेत बचाव कार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग - ghatkopar hoarding collapse

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का?...; प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी - आनंद दवे - Anand Dave On Praful Patel

राज्यात निवडणूक प्रचारात जुमलेबाजीची 'दीवार' - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.