ETV Bharat / state

"मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, पण आमच्या मनातील मूर्ती कशी हटवणार", शिर्डीतील साईभक्तांचा सवाल - Sai Baba Idol Controversy - SAI BABA IDOL CONTROVERSY

Sai Baba Idol Controversy : साईबाबांच्या मूर्तींवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत. आतापर्यंत 14 मंदिरातून मूर्ती हटवण्यात आल्या आहेत, यावर आता शिर्डीतील साईभक्तांकडून निषेध करण्यात येत आहे.

Sai Baba Idol Controversy
शिर्डीतील साईभक्तांकडून निषेध (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 4:53 PM IST

शिर्डी Sai Baba Idol Controversy : वाराणसीतील विविध मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या असून, त्याचा शिर्डीतील साईभक्तांकडून निषेध करण्यात येत आहे. मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, मात्र आमच्या मनातील मूर्ती कशी हटवणार, असा सवाल शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांकडून केला जातोय.

14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या : साईबाबांची पूजा करण्याबाबतही यापूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वाराणसीतील 14 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. कालीचरण महाराज नुकतेच शिर्डीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी साईबाबा एका विशिष्ट धर्माचे होते हे दाखवण्याचा कट रचला जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, दुसरीकडे सनातन रक्षक समितीनं उत्तर प्रदेशात साईंच्या मूर्ती हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

साईभक्त आणि ग्रामस्थांकडून निषेध : वाराणसीतील साईंच्या मूर्ती हटवल्या जात असल्याचा शिर्डीतून साईभक्त आणि ग्रामस्थांनी निषेध केलाय. "साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला त्यांनी स्वतःला कोणत्या धर्मात वाटून घेतलं नव्हतं," असं शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी सांगितलं.

भाविकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : "सबका मालिक एक हा महामंत्र देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांनी आपली जात आणि धर्म कधीच कोणाला सांगितला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून काही लोक अफवा पसरवून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं शिर्डी ग्रामस्थ प्रमोद गोंदकर यांनी सांगितलं.

याआधीही अनेकवेळा वाद : दरम्यान, साई बाबा यांच्या मूर्तीवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा साई बाबा यांच्या मूर्तीवरून वाद झाले आहेत.

हेही वाचा

  1. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : सरकारनं स्थापन केला चौकशी आयोग, तीन महिन्यात अहवाल येणार - Akshay Shinde Encounter Case
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्याचा बाळासह महिला डॉक्टरची आत्महत्या - Female doctor suicide
  3. सुनील तटकरेंना घेऊन जाण्यापूर्वी बावधानमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर, २ वैमानिकांसह इंजिनिअरचा मृत्यू - Helicopter crashes in bavdhan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.