ETV Bharat / state

सेवानिवृत्तीतील जमापुंजीसह आंगावरील स्त्रीधन साईचरणी अर्पण, मायलन कंपनीकडू दोन 'एक्स'रे' मशीन दान - X ray machines Donation to Sai Baba

X ray machines Donation to Sai Baba : सोलापूरच्या साई भक्त मंदाकिनी गुरूसिंग गावसाने यांनी सेवानिवृत्तीतील जमापुंजीसह आंगावरील स्त्रीधन साईचरणी अर्पण केलय. तसंच मायलन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिक आणि त्यांची पत्नी सीमा मलिक यांनी सुमारे 1 कोटी 15 लाख रुपयांच्या दोन एक्स-रे मशीन साईबाबांना दान केल्या आहेत.

Mandakini Gurusingh Gavasane
मंदाकिनी गुरूसिंग गावसाने यांचा साई संस्थानाकडून सत्कार (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 4:02 PM IST

प्रतिक्रिया देताना साई भक्त मंदाकिनी गावसाने (Shirdi Reporter)

शिर्डी X Ray Machines Donation To Sai Baba : साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीला येतात. या भाविकांनाकडून सोनं, चांदी, रोकड वस्तू स्वरूपात साईबाबांना दान केल्या जातात. एका महिला भाविकानं सेवानिवृत्तीतील जमापुंजी तसंच आंगावरील स्त्रीधन असं, एकून तब्बल 33 लाखांच दान साईचरणी केलय. तसंच मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिकसह त्यांच्या पत्नी सीमा मलिक यांनी सुमारे 1 कोटी 15 लाख रुपये किमतीचे दोन एक्सरे मशीन दान स्वरुपात दिले आहेत.

दोन एक्सरे मशीन दान : साई संस्थान मार्फत चालवल्या जात असलेल्या साईनाथ तसंच साईबाबा रुग्णालयाला मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजीव मलिक तसंच त्यांच्या पत्नी सीमा मलिक यांनी सुमारे 1 कोटी 15 लाख रुपये किमतीचे दोन एक्सरे मशीन दान स्वरुपात दिले आहेत. दोन्ही रुग्णालयात हे मशीन बसविण्यात आले. तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील एका सेवानिवृत्त महिलेनं आपली आयुष्यभराची कमाई, तसंच मंगळसुत्र, दागदागिन्यांसह तब्बल सव्वा तेहतीस लाख रूपयांची देणगी साईबाबांच्या साईचरणी अर्पण केली आहे.

वीस लाखांचा धनादेश दान : शिर्डी साईबाबा संस्थानचा कारभार पारदर्शी आहे. आपण दिलेल्या पैशाचा विनियोग चांगल्याच कामासाठी होईल. या एकाच विश्वासानं या महिलेनं आपले सर्व दागिने साईचरणी अर्पण केले. मंदाकिनी गुरूसिंग गावसाने असं या महिला भाविकाचं नाव आहे. त्या सोलापूरच्या आरटीओ कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या. 2015 साली त्या सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी वीस लाखांचा धनादेश तसंच 205 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, असे एकूण तेहतीस लाख चोवीस हजार रूपये साईचरणी अर्पण केले.

साई संस्थानात पारदर्शकता : नोकरीला लागण्यापूर्वी परिस्थिती नव्हती. नंतर नोकरीमुळं काही गोष्टी मला करता आल्या नाहीत. त्यामुळं आजवर त्या कधीही शिर्डीला साईदर्शनासाठी आलेल्या नाहीत. आपल्याला कोणीही वारस नाही. त्यामुळं कोणा लबाडाच्या हाती, हा पैसा जाण्याऐवजी साईबाबांच्या पायी वहाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. येथील पारदर्शकता, पैशाचा सदुपयोग याबद्दल त्या जाणुन होत्या. त्यामुळंच त्यांनी ही देणगी दिली. पेन्शनच्या पैशावर आपला उदरनिर्वाह होईल, असंही मंदाकिनी गावसाने म्हणाल्या.

महिला भाविकाचा सत्कार : केवळ साईसंस्थानचा कारभार पारदर्शी, विनियोग सेवाभिमुख असल्यानं महिला भाविकानं देणगी दिली. संस्थानच्या कार्याची ही पावती आहे. येथील प्रत्येक कामगार संस्थानचा विश्वस्त आहे. येथे येणाऱ्या भाविकाला उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी तो कायम तत्पर असतो. संस्थानकडून अन्नदान, रूग्णसेवा, ज्ञानदान, असे अनेक उपक्रम राबवले जात असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही देणगी स्वीकारली. संस्थानच्या वतीनं गाडीलकर यांनी या महिला भाविकाला साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळकेंसह इतरांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का :

  1. साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत; पाहा व्हिडिओ - Nita Ambani Sai Baba Darshan
  2. श्रीरामनवमी उत्सव काळात भाविकांचे साई चरणी 3 कोटी 79 लाखांचे दान; दोन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं साई दर्शन - Shirdi Sai Sansthan
  3. रामनवमी 2024 : शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाचा जल्लोष; लाखो भाविक शिर्डीत दाखल - Ram Navami 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.