ETV Bharat / state

रोहित पवारांचा अजित पवार यांच्या गटातील आमदार स्वत:कडे येण्याचा दावा पण स्वपक्षातील नेत्यांवरच संशय? - Rohit Pawar twitt

Rohit Pawar twitt : महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं होतं. या यशाचं श्रेय रोहित पवार यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलं आहे. आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणताय. नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विश्वासघात होऊ शकतो, तो होऊ नये अशी शंका उपस्थित केली आहे.

Rohit Pawar twitt
रोहित पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 8:52 PM IST

मुंबई Rohit Pawar twitt : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आले आहे. महाविकास आघाडीने महायुतीला आसमान दाखवलं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी सरस ठरली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यासोबतच आपल्याच पक्षातील काही नेत्यांबद्दल त्यांनी संशय देखील व्यक्त केला आहे.

सूरज चव्हाण अजित पवारांवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

आमच्या संपर्कात - रोहित पवार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. तसेच 12 आमदार बीजेपी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा त्यांनी म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्यावर टीका न करणाऱ्या आमदारांना परतीचे दरवाजे खुले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार राष्ट्रवादीत नाराजी काय : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं नसल्यानं अजित पवार नाराज असल्यानं ते दिल्लीतील एनडीएच्या बैठकीसाठी अनुउपस्थित असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश आलं नसल्यामुळे आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामतीच्या विजयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराज आमदारांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. दहा आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

ज्याच्या संदर्भात ट्विट त्यांना ते कळले असेल - महेश तपासे : रोहित पवारांचे हे ट्विट फार सूचक आहे. प्रामाणिकपणे पक्षाच्या मागे उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना निवेदन केलंय तर इकडे पण आणि तिकडे पण अशांना चेतावनी दिली आहे. त्यामुळे दुहेरी भूमिका असणाऱ्या कार्यकारणी संदर्भात ही चेतावणी असावी असं आपल्याला वाटत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत फार मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला 31 जागा दिल्या आहे. अजित पवार यांच्या पक्षाला एका जागेवर महाराष्ट्रातील जनतेने रोखून ठेवलं. यानंतर पुणे आणि शिरूरमध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. अजित पवार यांचा दरारा होता तो आता गेलेला आहे. ज्यांच्या संदर्भात त्यांनी हे ट्विट केलं आहे त्यांना याचा अर्थ नक्कीच कळला असेल, राजकारणात कोणती गोष्ट लपून राहत नाही असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

अशा नेत्याने जाणे पक्षासाठी फायद्याचे - हेमंत देसाई : रोहित पवार अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. पक्षातील एखादा बडा नेता अशाप्रकारे जर करत असेल तर अशा प्रकारचं ट्विट करण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांना सांगितलं नसेल असं आपल्याला वाटत नाही असं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी म्हटलं आहे. पक्षात फूट होऊन देखील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला चांगल यश मिळालं असून त्याचा स्ट्राईक रेट देखील चांगला आहे. हे सर्व असताना अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याने दुहेरी भूमिकेत राहणं हे धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं करणारा व्यक्ती का करत असावा, पक्षात त्याला कम्फर्टेबल वाटत नसावे. पक्षात घराणेशाही त्यामुळे त्याला उचित महत्त्व मिळत नाही. म्हणून तो नाराज आहे का हे बघावं लागेल. या नेत्याला त्यांना इशारा द्यायचा असेल तर हा इशारा त्यासाठी काफी आहे असं आपल्याला वाटतंय. इतकं चांगलं यश मिळालं असताना कोणाला शरद पवार यांचा पक्ष सोडून जावंसं वाटत असेल तर तो अविचारी आणि आत्मघातकी निर्णय असेल. पक्षात जर अशा प्रकारचा कोणी गद्दार आणि गुप्तहेर असेल तो पक्ष सोडून गेला तर उलट शरद पवार यांच्याच पक्षाला फायदा होईल. या ट्विटमधून अशांना इशारा दिला असून, असं कोणी असेल तर तो आपले प्रयत्न थांबवतील किंवा पक्षांतर करतील असं आपल्याला वाटत असल्याचं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

रोहित पवारांनी संपर्कातील आमदार जाहीर करावे - सूरज चव्हाण : रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटवर बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, रोहित पवार अशाप्रकारे दावा करून माध्यमांमध्ये फक्त ब्रेकिंग न्यूज म्हणून पाहणाऱ्या रोहित पवार यांनी आपल्या पक्षातील स्थान काय हे पाहावे. अनेक महिन्यापासून अशा प्रकारच्या ज्या कोरड्या उलट्या तुम्ही करता येते डिलिव्हरी कधी होणार हेसुद्धा महाराष्ट्राला सांगावं. तसेच सूरज चव्हाण यांनी रोहित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे की, त्यांनी जाहीर करावं की कोणते आमदार त्यांच्या संपर्कात आहे. तसेच मी ठामपणे आणि विश्वासाने सांगतो की, एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही असा विश्वास सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठकीत काय होणार चर्चा? - NCP Meetings Inside story
  2. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024
  3. झोपड्यांवर महापालिकेची करवाई: पवईत पोलिसांवर जमावाची दगडफेक, 5 पोलीस जखमी - Stone Pelting On Mumbai Police

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.