ETV Bharat / state

प्रशिक्षण न घेता जोपासला कलेचा छंद : मालदाडमधील विद्यार्थ्यानं बनवल्या आकर्षक मूर्ती - Attractive sculpture - ATTRACTIVE SCULPTURE

Attractive sculpture : संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील रेवणनाथ नवले या विद्यार्थ्यानं कोणतंही प्रशिक्षण न घेता आर्कषक मूर्ती बनवण्याचा छंद जोपासला आहे. त्याच्या मूर्ती पाहून परिसरातील नागरिक त्याचं कौतुक करतात. मात्र परिस्थितीमुळे या बालकलाकाराला त्याची कला जोपासण्यासाठी मदतीची गरज आहे.

Revannath Navale
रेवणनाथ नवले (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 6:53 PM IST

Updated : Aug 22, 2024, 7:54 PM IST

संगमनेर (अहमदनगर) Attractive sculpture : कला कोणतीही असो, ती उपजत असते. गरज आहे, ती आपल्यातील कलागुण ओळखण्याची आणि मेहनत करून कला वाढवण्याची. कुणाला गाण्याचा तर कुणाला वाजवायचा छंद असतो. मात्र, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील रेवणनाथ गणपत नवले या विद्यार्थ्याला मूर्ती बनवण्याचा छंद आहे. तो इयत्ता 9 वीत शिकत असून त्याला लहानपणापासूनच विविध आकर्षक मूर्ती बनवण्याचा छंद आहे. सध्या तो छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, गणपतीच्या विविध सुबक मूर्ती बनवत आहे. त्यामुळं त्याची कला पाहून परिसरात त्याचं कौतुक होत असतं.

मूर्ती बनवण्याची लहानपणापासून आवड : संगमनेर शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदाड येथे गणपत विश्वनाथ नवले यांना रेवणनाथ तसंच विनय अशी दोन मुलं आहेत. रेवणनाथ इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर विनय हा सहावीत शिक्षण घेत आहे. शेती नसल्यानं मोलमजुरी करून गणपत नवले कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यातच लहानपणापासून रेवणनाथला मूर्ती बनवण्याची आवड आहे. त्यामुळं तो विविध मूर्ती साकारतोय.

"दररोज मोलमजुरी करून आम्ही उदरनिर्वाह करतो. रेवणनाथला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्यामुळं सध्या तो हुबेहुब अशा आकर्षक मूर्ती बनवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दीड महिन्यात त्यानं बनवलीय. अशा अनेक मूर्ती त्यानं बनवल्या आहेत. त्यामुळं भविष्यात रेवणनाथ मोठा मूर्तिकार होईलं, असं आमचं स्वप्न आहे". - गणपत नवले, रेवणनाथचे वडील

प्रशिक्षण न घेता केली कला अवगत : सुरुवातीला त्यानं शेतातील काळ्या मातीपासून मूर्ती बनवण्याची सुरुवात केली. आता रेवणनाथ शाडूच्या मातीपासून आकर्षक मूर्ती बनवत आहे. कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यानं ही कला अवगत केली आहे. त्यामुळं अनेकजण त्याच्या घरी येऊन मूर्ती पाहून कौतुक करतात. शाळा सुटल्यानंतर तो घरी येऊन अभ्यासासह मूर्ती बनवण्याचं काम करतो. रेवणनाथला फक्त छायाचित्र दिलं की लगेच तो त्यावरून मूर्ती बनवतो. विशेष म्हणजे मूर्ती बनवून झाल्यानंतर तो स्वतःच रंगकामही करतो. कोणत्या मूर्तीला कोणता रंग द्यायचा याबाबतही त्याला सर्व माहिती आहे. तसंच मूर्ती बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आई-वडील उपलब्ध करून देतात. त्यामुळं रेवणनाथला मूर्ती बनवण्याचा छंद लागला आहे.

Last Updated : Aug 22, 2024, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.