ETV Bharat / state

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचं पहिलं दर्शन, मध्य भारतातील पहिली घटना - leopard cat - LEOPARD CAT

Leopard Cat Spotted In Pench Tiger Reserve : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळले. मध्यभारतात बिबट्या मांजर दिसण्याची ही पहिलीच घटना आहे.

rare sighting leopard cat spotted in pench tiger reserve maharashtra
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आढळले बिबट्या मांजर (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 1:32 PM IST

नागपूर Leopard Cat Spotted In Pench Tiger Reserve : महाराष्ट्राच्या हद्दीतील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आलं. ते ठिकाण एका हंगामी पाण्याचा प्रवाहाजवळ होतं. मध्य भारतामध्ये बिबट्या मांजर दिसण्याची ही पहिलीच घटना आहे. हे बिबट्या मांजर मानसिंग देव वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या बफर वनपरिक्षेत्र ‘नागलवाडी’ च्या नरहर बीटमधील कक्ष क्रमांक 663 मध्ये आढळले. हा परिसर ‘नरहर’ गावापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे.

मध्य भारतात बिबट्या मांजराचं अस्तित्व नाही : भारतात मांजर कुळातील एकूण 15 प्रजाती आढळतात. भारतात असलेल्या एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी 10 लहान प्रजाती आहे. या लहान प्रजाती मुख्यत: उंदीरांच्या शिकारीमुळं महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावतात. बिबट्या मांजर (Scientific Name : Prionailurus bengalensis) भारतातील रान मांजरीनंतरची सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती आहे. तिच्या अनुकूल लवचिकतेमुळं, ईशान्य भारत, उत्तर हिमालयीन राज्ये, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि पश्चिम घाटाच्या काही भागात ती मर्यादित रितीनं आढळते. मात्र, मध्य भारतात बिबट्या मांजरचं अस्तित्व नाही.

पेंच व्याघ्र प्रकल्प : पेंच व्याघ्र प्रकल्पाचं महाराष्ट्रातील क्षेत्रफळ एकूण 741.22 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये 7 वनपरिक्षेत्र (2 बफर वनपरिक्षेत्र आणि 5 कोअर वनपरिक्षेत्र) आहेत. या व्याघ्र प्रकल्पाचं नाव पेंच नदीवरून पडलंय. पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्व पेंच आणि पश्चिम पेंच अशा दोन भागात विभागले जाते. या व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडील भाग डोंगराळ असून दक्षिणेकडील भाग तुलनेनं सपाट आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आग्नेयेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उत्तरेला पेंच व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि ईशान्येला कान्हा व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश) सह कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी दर्शविते. पश्चिम वनपरिक्षेत्राच्या लगतच्या जंगलाला 1975 मध्ये राष्ट्रीय उद्यान आणि 1999 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. बिबट्याच्या एंट्रीनं पुण्यात खळबळ; इमारतीत बिबट्या घुसल्यानं नागरिक धास्तावले, पाहा व्हिडिओ - Leopard News
  2. Leopard Attack On 7 Years Girl : बिबट्याचा सात वर्षीय मुलीवर हल्ला; बिबट्या पकडण्यासाठी वनविभागानं लावले पिंजरे
  3. अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या परिसरात अल्पवयीन मुलीसह बिबट्याचा आढळला मृतदेह, दोघांच्या मृत्यूबाबत गूढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.