ETV Bharat / state

"तुमचं सरकार असताना काय दिवे लावले?"; राम कदम यांचा आदित्य ठाकरेंना सवाल - Ram kadam On Aaditya Thackeray - RAM KADAM ON AADITYA THACKERAY

Ram kadam On Aaditya Thackeray : कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले होते. आता आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत कोस्टल रोडच्या (Coastal Road) मुद्द्यावर महायुतीच्या सरकारवर निशाणा साधलाय.

Mumbai Coastal Road
आदित्य ठाकरे (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 9:31 PM IST

मुंबई Ram kadam On Aaditya Thackeray : मुंबईतील कोस्टल रोडच्या भुयारी मार्गात पाण्याची गळती लागल्यानं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत कोस्टल रोडच्या (Coastal Road) मुद्द्यावर महायुतीच्या सरकारवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडं भाजपा नेते, आमदार राम कदम (Ram kadam) यांनीही आदित्य ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलंय. आदित्य ठाकरे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत.

प्रतिक्रिया देताना आमदार राम कदम (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले आहेत, राम कदम? : मुंबईचा उन्हाळा सहन झाला नाही म्हणून लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गुलाबी थंडीत बसून श्रीमान युवराज आदित्य ठाकरे ट्विट करत आहेत. तर ट्विट सुद्धा काय करत आहेत तर मुंबईतील कोस्टल रोड संदर्भात चिंता व्यक्त करत आहेत. तुम्ही चिंता व्यक्त करायची? तुमची सत्ता असताना काय दिवे लावले?, कोणतं नवं विकासाचं काम सुरू केलंय. उलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली विकास कामे तुम्ही बंद पाडलीत. कशासाठी बंद पाडलीत तर स्वतःचा अहंकार, अट्टहास आणि कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे मिळावेत म्हणून. नेमक काय खरं आहे? तुम्ही विसरला असाल, परंतु महाराष्ट्र आणि मुंबई कधी विसरणार नाही. विकासाच्या वाटेत खोळंबा आणणारे तुम्ही लंडनमध्ये बसून मुंबईची चिंता करणार असा टोला, कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे याचं काय होत ट्विट ? : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, महाविकास आघाडीचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबईतील कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार होऊन नागरिकांसाठी खुला सुद्धा झाला असता. पण, या भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडलं आणि त्यांनी या कामाचा वेग मुद्दाम कमी करून खर्च वाढवण्याचं काम केलंय. फेब्रुवारीमध्ये त्यांनी अनेक वेळा उद्घाटनाच्या तारखा बदलल्या त्यावेळेस मी ते निदर्शनास सुद्धा आणलं होतं आणि ते सुद्धा फक्त एका लेनसाठी सुरु होतं. शेवटी आम्ही केलेल्या कामाचं आयते श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत त्यांनी १ लेन सुरू केली. ही लेन सुद्धा, जी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच खुली असते. त्यानंतर आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली. आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मेपर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आला असून आता तरी अंतिम तारीख समजेल का? तसचं आमचं सरकार आल्यावर या विलंबाची पूर्णपणे चौकशी करू, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. मालगाडी घसरल्यानं पश्चिम रेल्वेला फटका, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं - Goods Train Derailed At Palghar
  2. वयाच्या 50 व्या वर्षी 'माउंट एव्हरेस्ट' सर, एव्हरेस्ट सर करणारी राज्य पोलीस दलातील पहिली महिला अधिकारी - Dwarka Doke climbed Mount Everest
  3. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धंगेकर आणि अंधारे यांचा मोर्चा; कार्यालयातच वाचून दाखवली हप्तेखोरीची यादी - Ravindra Dhangekar News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.