मुंबई Praful Patel In Siddhivinayak Temple : राज्यसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानिमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार प्रफुल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
दर्शनाचा व्हिडिओ फोटो आल्यानंतर लोड करतो : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली. राज्यसभा कार्यकाळ असताना देखील प्रफुल पटेल यांना पक्षाकडून पुन्हा राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. एक वाजताच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सिद्धिविनायकाच्या चरणी झाले लीन : राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यास पूर्वी प्रफुल पटेल दादर येथील सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. "चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करायला हवी, यासाठी मी आज बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचे त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. "माझी राज्यसभेचा कालावधी शिल्लक असलेली जागा त्या दुसऱ्या कोणाला संधी मिळेल, त्यामुळं फार काही अंदाज लावणं योग्य होणार नाही. मी मुदतपूर्वी पुन्हा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल का केला, याचं रहस्य लवकरच तुमच्या समोर येईल," राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, "आमच्या बाजुनं निकाल लागावा म्हणून देवाकडं प्रार्थना करतो. संध्याकाळी निर्णय येईल, त्याबद्दल वाट बघू. मात्र आमच्या बाजुनं निर्णय यावा, यासाठी देवाकडं प्रार्थना करत आहे."
इलेक्ट्रॉल बॉण्डचा वापर तात्काळ थांबवावा : सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रॉल बॉण्डचा वापर तत्काळ थांबवावा, याबाबतचा निर्णय दिला आहे. यावर बोलताना त्यांनी "सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत मी बोलू इच्छित नाही, मात्र तो निकाल सर्वांना मान्य करावा लागतो. इलेक्ट्रॉल बॉण्डची प्रथा यापूर्वी देखील कायद्याद्वारेच करण्यात आली होती. त्यात काही बदल करायचा असेल, तर येणाऱ्या काळात संशोधन होईल," असं पटेल म्हणाले
निवडणूक होईल बिनविरोध : निवडणूक बिनविरोध होईल, तीन वाजेपर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. बहुतेक सहाच उमेदवार दिल्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास वाटतो," असंही प्रफुल पटेल यांनी बोलून दाखवलं. "जर निवडणूक झाली तरी आम्हाला चिंता करायची गरज नाही. सगळ्यांकडं कोट्याप्रमाणं मत आहेत."
हेही वाचा :