ETV Bharat / state

Rahul Gandhi : मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा एक रुपयाही नाही; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका - Rahul Gandhi criticise PM narendra

Rahul Gandhi : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी तिथं एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Rahul Gandhi: उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा एक रुपयाही नाही; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 2:52 PM IST

Updated : Mar 16, 2024, 11:52 AM IST

चांदवड (नाशिक) Rahul Gandhi : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा पार पडली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकार तसंच मीडियावर चांगलीच टीका केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात 'राम राम मंडळी' म्हणत मराठीतून केली. यानंतर जनतेनंही जोरदार 'राम राम' म्हणत त्यांना प्रतिसाद दिला.

मीडिया शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवत नाही : या सभेत बोलताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, "इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा कांद्याचा आहे. या कांद्याला योग्य भाव मिळावा व कांदा शेतकरी सुखी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज्यात, देशात सगळ्यात मोठे मुद्दे शेतकऱ्यांचे, बेरोजगारी, महागाईचे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सांगितलं. मात्र टीव्ही मीडियामध्ये हे सगळे मुद्दे येणार नाहीत. तिथं चित्रपट सिनेमा व मोदींना दाखवतात. मोदी समुद्रात जातात खाली पूजा करतात ते टीव्हीवर दाखवलं जातं. त्यांच्या मागं विमानतळावर मीडिया पोहचते. मात्र, शेतकरी व बेरोजगार तसंच महिलांच्या प्रश्नांवर मीडिया बोलत नाही. कोविड आल्यावर थाळ्या वाजवतील आणि मीडिया त्याला 24 तास चालवतील." तसंच 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं तुमचं किती कर्ज माफ केलं? शेतकरी दिल्लीच्या मैदानात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचा एक रुपया माफ नाही केला, याउलट उद्योगपतींना 16 लाख करोड रुपये माफ केले. यूपीए सरकारच्या काळात 70 हजार करोड रुपये शेतकऱ्यांचे माफ केले. एक कागद न घेता आम्ही तुमचे एकदा कर्ज माफ केलं, मोदी सरकारनं एकदा पण केलं नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

आम्ही सत्तेत आल्यावर दिल्लीत शेतकऱ्यांचं सरकार येईल : पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधी पुढं म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. ज्यांचं कर्ज माफ केलं त्यांच्याकडं अमाप पैसा आहे. तुम्हाला चारही बाजूनं घेरलं जातंय. चांगला भाव शेतकऱ्यांना देत नाही, जीएसटी लावली जाते. देशातील श्रीमंत उद्योगपतींचं कर्ज माफ होतंय. जीएसटी सगळे सारखेच भरतात. त्यांचं कर्ज माफ होऊ शकतं मग तुमचं का नाही?" दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन ते म्हणाले, "भाजपा सांगतं कायद्यानं एमएसपी लागू केली जाऊ शकत नाही. पण आम्ही सांगतो हे होऊ शकतं. विमा योजनेत तुम्हाला नुकसान होतं यात तुमचा फायदा होत नाही. या योजनेत तुमचं रक्षण करणं गरजेचं आहे. कांदा विकताना आयात निर्यात धोरणं बदलली जातात. आमचं सरकार आल्यानंतर आयात निर्यात धोरण शेतकरी हिताचं राहणार नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यावर विविध कर लावले जात आहेत. जीएसटीच्या माध्यमातून आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करु, आमचे दरवाजे हे तुमच्यासाठी नेहमी खुले राहणार आहेत." आम्ही सत्तेत आल्यावर दिल्लीत शेतकऱ्यांचं सरकार राहील सरकारचं कर्तव्य आहे. त्यांनी जवान आणि किसान दोघांचं रक्षण करावं कारण तुमच्याशिवाय देश चालू शकत नाही. माझे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे राहील असं आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिलंय.

राहुल गांधींना साथ द्या : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी यांची विचारधारा घेऊन चालणारं नाशिक आहे. येथील शेतकरी मोठे कष्ट करतो यांच्याकडे लक्ष दिलं जायचं पण आत्ताचं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, तेव्हा कांद्याच्याबाबत विषय होता निर्यात बंदी लावली होती. कांद्याचे भाव वाढले होते जगणं मुश्किल झालं असे लोक संसदेत म्हणायचे त्याला मला उत्तर द्यायचं होतं मी उत्तर देताना कांद्याला बाजारमूल्य मिळू नये यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मी त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाजूनं उभा राहिलो होतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. मी लगेच गेलो, त्या प्रकरणाच्या शेवटी गेलो तेव्हा कळलं मुलीचं लग्न मोडलं होतं. तो धक्का सहन झाला नाही त्यावेळी त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्यानंतर मी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज कमी केलं. लगेच कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत त्यांनी जुना प्रसंग सांगितला. मोदी सरकार कामाचं नाही, सामुदायिकपणे काहीतरी करावं लागेल मोदींच्या विरोधात लोकांना एकत्र करायचं काम राहुल गांधी करताय त्यांना साथ द्या, असं आवाहन पवार यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi News: उद्योगपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना-राहुल गांधी

Last Updated : Mar 16, 2024, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.