ETV Bharat / state

दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case - NAGPUR MURDER CASE

Nagpur Murder Case : ८८ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचे 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू नसून सुनियोजित हत्या आहे हे कसं समोर आलं.

Nagpur Murder Case
पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 4:13 PM IST

नागपूर Nagpur Murder Case : नागपूर पोलिसांनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा कट कसा उघड केला. या संदर्भात नवीन माहिती पुढे आलेली आहे. त्या आधारे नागपूर पोलिसांनी हिट अँड रन सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला आहे.

तपास केला होता बंद : पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघातात झाला हे सत्य मानून पोलिसांनी ही अपघाती मृत्यूची नोंद करत तपास बंद केला होता. मात्र, तरी हे सत्य सर्वांसमोर आलं. आरोपींनी फुल-प्रूफ योजना आखून पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा काटा काढला होता. आरोपी आपल्या कामात यशस्वी देखील झाले होते. त्यानंतर १५ दिवस लोटल्यानंतर असं काय घडलं की, ज्यामुळे सर्व आरोपी पोलिसांच्या कस्टडीत पोहोचले आहेत.

आणि पोलीस कामाला लागले : आतापर्यंत तपासात समोर आलेल्या माहितीनुसार एक भुरटा गुन्हेगार नीरज निमजे गेल्या काही दिवसांपासून अचानक महागड्या पार्ट्या देऊ लागला होता. मित्रांवर अमाप खर्च करू लागला. कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधीचं मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसने मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला. दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला होता. त्यामुळे काहीना त्यांच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आला असून तो दारूच्या पार्ट्या करत आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.

आरोपीला दारू पार्ट्या नडल्या आणि बिंग फुटले : पोलिसांनी निरजच्या संदर्भातील माहिती गोळा करायला सुरुवात केली. नीरजच्या अवतीभवती खबरे पेरले. एका अपघाताच्या प्रकरणानंतरच नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना समजली. नागपूर शहरामध्ये कुठे अपघाताचे प्रकरण घडले आहे का, ज्यामध्ये अद्यापही आरोपी चालक सापडलेले नाही, याची माहिती घेणं सुरू केली असता बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार अपघात प्रकरण समोर आलं. गुन्हे शाखा पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेतले. सुरुवातीला नीरज हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर आणखी संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवयाचं आरोपी नीरजने पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच पोलिसांना दिली.

काय आहे प्रकरण? : सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केवळ आपल्यालाचं मिळावी या हेतूने नागपुरात एका सुनेने सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पुरुषोत्तम पुट्टेवार असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची मास्टरमाइंड ही अर्चना मंगेश पुट्टेवार आहेत. त्या गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहे. अर्चनाने तिचा भाऊ प्रशांतच्या मदतीने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारने चिरडून हत्या केली होती. या घटनेनंतर तब्बल १८ दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांच्यासह तिचा भाऊ प्रशांत पारलेवार आणि प्रत्यक्षात हत्याकांड घडणाऱ्या तीनही भाडोत्री सुपारी किलरला देखील अटक करण्यात आली आहे.

उच्चपदस्थ बहीण भावाने रचला हत्येचा कट : ८८ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात पोलिसांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे (एमएसएमई) संचालक प्रशांत पारलेवार यांनाही अटक केली आहे. प्रशांत पार्लेवार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गडचिरोली नगर विकास सहाय्यक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार याचे भाऊ आहे. याप्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या रडावर असून त्यांनाही लवकर अटक होण्याची शक्यता आहे.

सुपारी किलरला लाखोंचे आमिष : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांनी अगदी नियोजित पद्धतीने हत्येचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या घरातील चालक सार्थक बागडे, नीरज निमजे व सचिन धार्मिक यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारने चिरडून हत्या केली. आरोपींनी या कामात दोन कार व पाळत ठेवण्यासाठी दुचाकीचा वापर केला होता. सर्व वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

आरोपीला बार सुरू करायचा होता : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी सचिन धार्मिक याला स्वतःचा बार सुरू करायचा आहे. पण त्याचा अर्ज हा वारंवार रद्द होत असल्याची माहिती आरोपी अर्चना पुट्टेवार व तिचा भाऊ प्रशांत पारलेवार यांना होती. त्यांनी हीचं बाब हेरून सचिन धार्मिक याला बारचा परवाना व जागा मिळवून देण्याचे आमिष दिले होते, अशी माहिती देखील तपासात उघड झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या झाल्यानंतर आरोपी सचिन धार्मिकने बारचा परवाना मिळवण्यासाठी नव्याने अर्ज दाखल केला होता.

हत्या करताना अपघाताचा बनाव रचला : नागपूर शहरातील बालाजी नगर परिसरात २२ मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सुपारी किलिंग असल्याचं तपासात उघड झालं आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात अनेक कोटीची संपत्ती आहे. पुरुषोत्तम आणि त्याच्या मुलात संपत्तीचा वाद न्यायालयात सुरू होता. पुरुषोत्तम संपूर्ण संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील या भीतीने सून अर्चना पुट्टेवार यांनी तिचा भाऊ प्रशांत वाटेकर यांच्या मदतीने सासऱ्याच्या हत्येचा कट रचला.

यापूर्वी दोन वेळा प्रयत्न फसला : मुख्य आरोपी अर्चनाच्या निर्देशावरून सार्थकने दोनदा पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ते थोडक्यात वाचले होते. म्हणून आरोपींनी त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने एक कार विकत घेतली आणि २२ मे ला ती कार पुरुषोत्तम पुट्टेवारच्या अंगावर घालून त्याची हत्या केली.

हत्याकांडात अर्चनासह ६ आरोपींचा सहभाग : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणाची मास्टरमाइंड ही त्यांची सून अर्चना असून कामात अर्चनाचा भाऊ प्रशांत हा सहभागी आहे. प्रशांतने सार्थक नीरज आणि अन्य आरोपीची मदत घेतली. याशिवाय अर्चनाची पर्सनल सेक्रेटरी पायलचा देखील सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी एकूण सहा आरोपीना अटक केली आहे.

हेही वाचा:

  1. नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू - Nagpur Fire
  2. रंगेहात सापडलेल्या पतीला चोप देऊन त्याच्या मैत्रीणीला ठेवलं बांधून, पोलिसांनी केली महिलेची सुटका - husband found red handed
  3. आरएसएस सुनेत्रा पवारांना विरोध करणार का? मोहन भागवतांना संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.