ETV Bharat / state

पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई, 340 किलो मेफेड्रोन सदृश्य ड्रग्जसाठा जप्त, दोघांच्या मुसक्या आवळल्या

Drug Stock Seized In Pune : पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी आज (2 मार्च) विश्रांतवाडी परिसरात छापेमारी करत 340 किलो मेफेड्रोन सदृष्य ड्रग्जसाठा जप्त केला आहे. एका टेम्पोमध्ये हा माल ठेवण्यात आला होता.

Pune police seized 340 kg of mephedrone
ड्रग्जसाठा जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 7:33 PM IST

ड्रग्ज तस्करांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त

पुणे Drug Stock Seized In Pune : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, सांगली येथे कारवाई करत जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांचे 1750 किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. दरम्यान आज (2 मार्च) पुन्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात छापेमारी करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 340 किलो मेफेड्रोन सदृश्य साठा पकडण्यात आला आहे. एका टेम्पोतून हा माल पकडण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मेफेड्रोनच्या साठ्याचा ट्रक पकडला : याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुण्यात याआधी जे आरोपी अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. यावेळी विश्रांतवाडी येथे गोडाऊनमध्ये माल सापडला होता. आरोपीकडून मेफेड्रोन सदृश्य साठा टेम्पोमध्ये देखील ठेवण्यात येत होता. आज पोलिसांकडून तो ट्रक शोधून काढण्यात आला आहे. ड्रग्जचे जे गोडाऊन होते त्यापासून 3 किमी लांबवर हा टेम्पो ठेवण्यात आला होता. तिथं आज (2 मार्च) कारवाई करत जवळपास 340 किलोचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. एमडी आणि मॅथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते या गाडीत ठेवण्यात आलं होतं. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

आतापर्यंत 9 आरोपींना अटक : पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, पुण्यात ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 7 ते 8 आरोपी हे फरार असून आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून होलसेल मार्केटमध्ये जागोजागी पाहणी केली जात आहे. ड्रग्जची तस्करी करणारे लाेक आमच्या रडारवर असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुण्याचे ड्रग्ज कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर : पुणे ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावरही असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 21 फेब्रुवारी, 2024 रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली होती. तसंच या प्रकरणात पुणे पोलिसांनी दिल्लीत देखील कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे पोलीस 'सॅम ब्राऊन' या नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेत होते. सॅम नावाच्या या सूत्रधाराचे आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. पुणे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना 3 महिन्यात 2000 किलो एमडी बनवण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली होती. भुजबळ नावाच्या आरोपीला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला सॅम नावाच्या एका गृहस्थानं दिल्याचं बोललं जातं. त्यानंतर भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभमध्ये ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याची माहिती दिली गेली.

हेही वाचा:

  1. गुजरात किनारपट्टीवर संशयित इराणी बोट ताब्यात; 1000 कोटींपेक्षा अधिकचे अंमली पदार्थ जप्त
  2. येरवडा कारागृह ते आंतरराष्ट्रीय तस्करी; पुणे ड्रग्स प्रकरणाचा प्रवास
  3. मिठाच्या पिशव्यातून ड्रग्जची तस्करी; सांगलीत 300 कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.