ETV Bharat / state

आरोग्य प्रमुखाचे मुख्यमंत्र्यांवर लेटर बॉम्ब, मंत्री महोदयांच्या दबावामुळे माझे निलंबन झाल्याचा सनसनाटी आरोप - Dr Bhagwan Pawar Allegation - DR BHAGWAN PAWAR ALLEGATION

Dr Bhagwan Pawar Allegation : पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ. भगवान पवार यांनी कामात चुका केल्याचा ठपका ठेवून त्यांना राज्य सरकारकडून निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी थेट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले आहेत. मंत्र्यांच्या नियमबाह्य कामात मदत न केल्याने आपल्याला निलंबित करण्यात आल्याचं ते म्हणाले.

Etv BharatDr Bhagwan Pawar Allegation
डॉ. भगवान पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 7:21 PM IST

पुणे Dr Bhagwan Pawar Allegation : पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ. भगवान पवार यांचे दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. डॉ. पवार यांच्या विरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले आहेत.

नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून निलंबन : डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, माझे कामकाज आणि सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून आणि हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरीत होऊन माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे तसेच इतर कामांमध्ये मदत करण्यास दबाव आणला होता; परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही तसेच इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती. यानंतर आरोग्य अधिकारी (प्रमुख), महानगरपालिका पुणे हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करण्यात आलेलं आहे.

निलंबनामुळे कुटुंबा मानसिक तणावात : डॉ. भगवान पवार मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत पुढे म्हणाले की, माझे निलबंन हे माझ्या विरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही हेतुपुरस्सरपणे, त्रास देण्याच्या हेतूने आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे, अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करीत असताना, माझ्या सध्याच्या कार्यकाळातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि मला माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करून माझ्यावर अन्याय झालेला आहे, असं म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. EXCLUSIVE : "...तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाही धोका दिला असता"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप - CM Eknath Shinde Interview
  2. पदवीधर निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध भाजपात 'सामना'; अभिजित पानसे Vs निरंजन डावखरेंमध्ये 'टाईट फाईट' - vidhan parishad election 2024
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ, 29 मे पर्यंत सुनावली कोठडी - Bhavesh Bhinde Police Custody

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.