ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update - PUNE HIT AND RUN CASE UPDATE

Pune Car Accident Case Updates : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये चार खासगी व्यक्तींकडून फेरफार करण्यात आल्याची धक्कादायकबाब समोर आलीय. दरम्यान, ते चार जण कोण? याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Pune Car Accident Case Updates
पुणे हिट अँड रन प्रकरण (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 9:57 AM IST

Updated : May 30, 2024, 11:53 AM IST

पुणे Pune Car Accident Case Updates : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलानं पोर्शे कारनं दोघांना चिरडलं होतं. या प्रकरणात रोज मोठ-मोठे खुलासे होत असून तीन दिवसांपूर्वीच या घटनेतील मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा प्रकार समोर आला होता. तसंच याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी त्रfसदस्यीय समितीही नेमण्यात आली. मात्र, असं असतानाच आता अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये चार खासगी व्यक्तींकडून फेरफार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. त्यामुळं हे चार जण कोण? असा प्रश्न उपस्थित केल्या जातोय.

खासगी व्यक्तींनी ब्लड सँपलची अदलाबदल केली : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. तसंच हळूहळू या प्रकरणाचे सर्व धागेदोरे उलगडत चाललेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, यावेळी बाहेरुन येऊन चार खासगी व्यक्तींनी ब्लड सँपलची अदलाबदल केल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांवर टाकला दबाव : सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल घेतले होते. काही वेळानं त्या ठिकाणी काही खासगी व्यक्ती आले. त्यांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास त्यांना भाग पाडलं. एवढंच नाही तर त्या खासगी व्यक्तींनी स्वत: सोबत आणलेले ब्लड सँपल त्या ठिकाणी ठेवले. त्यामुळं ते चार खासगी व्यक्ती कोण? ते कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.

पोलीस तपासात धक्कादाय माहिती- डॉ. अजय तावरे यांच्याकडून माझ्यावर ब्लड सँपल बदलण्यासाठी दबाव आण्यात आला होता, अशी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी पोलीस तपासात धक्कादायक माहिती दिली. ब्लड सँपल फेरफार प्रकरणी डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे हे अटकेत आहेत. खासगी व्यक्तींकडून डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव आणल्याची माहिती डॉ. हाळनोर यांनी पोलीस तपासात दिली.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई - डॉ. विंकी रुघवानी - Pune hit and run case
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणी तीन सदस्यीय समिती ससूनमध्ये दाखल - Pune Hit And Run Case Updates
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case

Last Updated : May 30, 2024, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.