ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 8:25 PM IST

State Excise Department: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर विभागाच्या भरारी पथकानं १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत जवळपास ४११ आरोपींना अटक केली. तसेच अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

State Excise Department
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे State Excise Department : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगानं अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

2 कोटी 81 लाखांचा मुद्देमाल जप्त: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकानं १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत जवळपास ४११ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर आणि १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने जप्त केली. या सर्व मुद्देमालाची किंमत २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये इतकी आहे.

मद्यपींवर ५ लाख ८३ हजारांचा दंड: १ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यां विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं १७० आरोपींना दोषी ठरविलं. या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रुपये इतका द्रव्य दंड ठोठविला गेला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची सक्रियता: आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री होत आहे. तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागानं एकूण १४ नियमित आणि ३ विशेष पथके तयार केली आहे. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्यसाठ्यावर तसेच नियमबाह्य दारूच्या विक्री आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

  1. Liquor Illegal Stock Seized In Chandrapur: मोठ्या दारू विक्रेत्याची ग्रामीण भागात तस्करी?; होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली कारवाई
  2. Major Action By The State Excise Department : सातार्‍यात 53 लाखांचा दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
  3. मलंगगडाच्या पायथ्याशी ५० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; दारू माफियांचे त्रिकुट जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.