पुणे : हडपसर येथील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचं अपहरण करुन खून करण्यात आला. या खून प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. सतीश वाघ किडनॅपिंग आणि हत्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत शिताफीनं दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. या खुनाचा पोलीस लवकरच उलगडा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांनी दोन संशयितांना ठोकल्या बेड्या : सतीश वाघ यांचा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केल्यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली. त्यामुळे गुन्हे शाखेनं पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे यांना ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील फुरसुंगी येथील सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्लु बेरी समोर सतीश वाघ हे थांबले होते. यावेळी त्यांना जबरदस्तीनं चारचाकी गाडीत घालून त्यांचं अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलानं तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा तपास सुरू असतानाच यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी स्थापन केले 17 पथक : सतीश वाघ किडनॅपिंग आणि हत्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत शिताफीनं दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सतीश वाघ यांच्या खुनामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इतर आरोपी बाबत माहिती घेणं चालू आहे. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची किडनॅपिंग करुन हत्या करण्यात आली, याबाबतचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांकडून 16 ते 17 पथक तयार करण्यात आले असून ते ठिकठिकाणी तपास करत आहेत. तपासात या दोन आरोपींना पुण्यातील वाघोली इथून ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा :