ETV Bharat / state

पर्यावरणाचा संदेश देत 1513 विद्यार्थ्यांकडून 'रिसायकल प्लास्टिक बँण्डचं' सादरीकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 12:42 PM IST

Recycled Plastic Band : नाशिक येथील इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत परकेशन बॅण्ड तयार केलं आहे.

Recycled Plastic Band
प्लास्टिक बँण्डचे सादरीकरण

नाशिक Recycled Plastic Band : प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करून नाशिकच्या 'इस्पॅलियर' स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परकेशन बँण्डनं शनिवारी (दि. 24) जागतिक विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, एकाच वेळी तब्बल 1250 हून अधिक विद्यार्थी आणि 263 हून अधिक शिक्षक आणि कर्मचारी यांनी या बँण्डचं सादरीकरण करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक आँफ रेकाँर्डमध्ये आपल्या विक्रमाची नोंद केलीय. प्रख्यात जेम्बे वादक पंडित उस्ताद तौफीक कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम पार पडला.

एकाच वेळी केलं बँण्डचं सादरीकरण : विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पकतेतून साकार झालेल्या या प्लास्टिक बँण्डद्वारे संगीता बरोबरच सामाजिक बांधिलकीची ही जाणीव विद्यार्थ्यांनी करून दिली. प्रत्येक गोष्टीत संगीत, सूर, कला आहे. ती निर्माण करण्याची ओळखण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची क्षमता ही निर्माण व्हायला हवी. विद्यार्थ्यांनी हीच कला प्लास्टिकच्या बँडद्वारे शोधत केलेल्या सर्जनशील नवनिर्मितीचं कौतुक पंडित उस्ताद तौफीक कुरेशी यांनी यावेळी केलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या बँण्डला सर्व स्तरातून चांगली दाद मिळाल्यानंतर शनिवारी 24 फेब्रुवारीला शाळेतील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या प्लास्टिक बँण्डचं सादरीकरण केलं. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या विक्रमाची नोंद याप्रसंगी एशिया बुक ऑफ रेकॉर्डचं आणि इंडिया बुक आँफ रेकॉर्ड यांनी घेतली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची शपथ घेतली. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व कळावे : पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नवीन पिढीला पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व कळावं तसेच आपल्या कृतीतून पर्यावरणाचं रक्षण व्हावं हा संदेश देण्यासाठी प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा वापर करत हा सांगितिक बँण्ड तयार करण्यात आलं आहे. प्लास्टिकचा कमी वापर करा, पुनर्वापर तसेच पुनर्निर्मिती असा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असं यावेळी शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली!; तब्बल ३० हजारहून अधिक सायकलपटूंचा सहभाग
  2. Amravati News: आगळावेगळा विवाह सोहळा; मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींना दिली तब्बल २ हजार जलपात्रे भेट
  3. पर्यावरण जनजागृती, विदर्भातील प्रणालीचे 8 महिन्यांपासून सायकलवरून भ्रमण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.