सातारा Maharashtra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरुन वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत नेमकं काय घडलं? यावर उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी "महायुतीत बरीच गडबड असून अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरुवात झाली" असा गौप्यस्फोट केला. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पवार भेटीचं दुसरंही कारण असू शकतं : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोमवारी कराडमध्ये झालं. त्यानंतर थोरातांनी माध्यमांशी संपर्क साधला, ते म्हणाले की, " शरद पवारांच्या भेटीबद्दलचं कारण भुजबळांनी सांगितलं असेल, तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु, 'दुसरंही कारण असू शकतं', असा टोलाही त्यांनी लगावला."
क्रॉस वोटिंग करणाऱ्यांची देवेंद्र फडणवीस-अजित पवारांसोबत बैठक? : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर भाष्य करताना थोरात म्हणाले, "ते आम्हाला माहीत नाही. परंतु, काही लोकांनी क्रॉस वोटिंग केलं. त्याबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडं आली आहे. त्याबद्दलचा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवला आहे. संबंधितांबद्दलचा निर्णय योग्य वेळी होईल."
तर जयंत पाटील विजयी झाले असते: मराठा-ओबीसी संघर्षावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "छगन भुजबळांचं शरद पवारांशी काय बोलणं झालं? पवारांनी त्यांना काय सांगितलं? हे आपल्याला माहिती नाही. परंतु, राज्यात निर्माण झालेला जातीय संघर्ष थांबवायचे प्रयत्न झाले पाहिजेत. असे प्रश्न रस्त्यावर उतरुन सुटत नाहीत. विधान परिषद निवडणुकीत आमच्याकडं जेमतेम मतं होती. आमचे मित्र पक्ष आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातील लोकांची मतं मिळाली तर जयंत पाटलांचा विजय होईल, अशी अपेक्षा होती."
हेही वाचा
- 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024
- "शरद पवारांनी तेव्हा समेट घडवून आणला.." छगन भुजबळांचं सिल्व्हर ओकवरील भेटीनंतर स्पष्टीकरण - CHHAGAN BHUJBAL News
- विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा- ओबीसी संघर्षातून ध्रुवीकरण - Maratha VS OBC Reservation