ETV Bharat / state

महायुतीच्या नेत्यावर मोदींचा विश्वास नाही; नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली - मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर

Narendra Modi visit to Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर विश्वास नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांना काही काम नसल्याचा टोला लगावला आहे.

Narendra Modi visit to Pune
Narendra Modi visit to Pune
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 5:38 PM IST

मुंबई Narendra Modi visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येतेय. मोदी जानेवारी महिन्यात 3 वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आता फेब्रुवारीमध्ये देखील मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळं मोदींचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे का? त्यांना महाराष्ट्रात सतत का यावं लागत आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सतत महाराष्ट्रात येत असून, महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांवर त्यांच्या विश्वास नसल्यानं मोदींना महाराष्ट्र दौरा करावा लागत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मोदींच्या दौऱ्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यात मोदींचा कसा असणार दौरा : 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे दौऱ्यात मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल, पुणे मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे. कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. त्यादिवशी मोदी शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळी नतमस्तक होणार असल्याची माहिती मिळतेय. तसंच मोदी 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मोदी नागपुरात भाजपाच्या एससी सेलच्या देशभरातील 25 हजार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढं येत आहे. त्यामुळं मोदी एकूण 3 वेळा महाराष्ट्रात येणार आहेत.

विकासकामांसाठी येत असतील तर गैर काय : पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार विकासात्मक कामांसाठी महाराष्ट्रात येत असतील तर, त्यात गैर काय? महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे, म्हणून ते राज्यात येत आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राला किती प्राधान्य दिलं होतं? असा सवाल शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत यांनी उपस्थित केला आहे. सध्या विरोधकांकडं कोणताच मुद्दा नसल्यानं त्यांनी मोदी महाराष्ट्रात येत असल्यावरून टीका केलीय. त्यामुळं विरोधकांनी अशी टीका करणं अत्यंत चुकीचं असल्याचं सावंत यांनी म्हटंलय. तिन्ही पक्षातील नेत्यावर मोदींचा विश्वास नाही का? त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं का? असा प्रश्न सावंत यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, असं बिल्कुल नाही तिन्ही पक्षांच्या नेत्यावर मोदींचा विश्वास आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन उपमुख्यमंत्री राज्याला विकासाकडं नेण्याचं कार्य करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचं सहकार्य मिळत आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान मोदी राज्यात येऊन काही विकास निधी देत असतील, तर त्यात गैर काय आहे? असं अरुण सावंत यांनी म्हटलं आहे.

जनता भाजपाला त्यांची जागा दाखवेल : ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपानं फोडली. मोदी-शाह यांच्या पुढाकारानं शिवसेना संपवली. याचा तीव्र संताप महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भाजपाच्या विरोधात आहे. तसंच अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांनाच सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री केलं, ही घटना देखील राज्यातील जनतेला पटलेली नाही. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला त्यांची जागा दाखवण्याचं जनतेनं ठरवलं आहे. याची माहिती मोदींना मिळाली असल्यामुळं ते महाराष्ट्रात भाजपाला मजबूत करण्यासाठी वारंवार येत आहेत, असं शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्र दौरा करावा लागत आहे, असंही राऊत म्हणाले. या बदमाश टोळक्यांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाचीसुद्धा फसवणूक केली असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

महायुतीच्या ताकदीचा मोदींना अंदाज : शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तसंच अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री करण्यात आलं. सध्या तिन्ही पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचं सरकार असलं, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मूळ शिवसेनेतील मतं घेऊ शकतील एवढी त्यांच्यात ताकद नाहीय. जोपर्यंत शरद पवार हयात आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादीची मतं अजित पवार घेऊ शकतील एवढी त्यांच्यातही क्षमता नाही. याची जाणीव भाजपा पक्षश्रेष्ठींसह मोदींना आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत महाराष्ट्र दौरा करावा लागत आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. तसंच तिन्ही पक्षातील नेत्यांचा आवाका, त्यांची ताकद मोदींच्या लक्षात आली आहे. त्यांच्यावर मोदींचा विश्वास नाही आहे. त्यामुळं मोदी या नावाचा करिष्मा वापरून लोकांचं मन परिवर्तन करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे, असंही माईणकर म्हणाले. मुळात महाराष्ट्रात भाजपाची मतं लिमिटेड आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे लोकांचं मनपरिवर्तन करण्यात कमी पडत आहे, असं जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का :

  1. राज्यसभेच्या 6 जागांवर कुणाची लागणार वर्णी? उद्धव ठाकरे, शरद पवार गटाला फटका
  2. "भुजबळ स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा", विरोधी पक्षनेत्याचं आव्हान
  3. केळी पिकविम्याचे पैसे मिळत नसल्यानं जळगावात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.