ETV Bharat / state

गरोदर महिलेसाठी खाटेची कावड, दोन किलोमीटर पायपीट; प्रसुतीनंतर दगावलं बाळ - Pregnant Woman Carried On Cot

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 1:47 PM IST

Updated : Aug 6, 2024, 4:14 PM IST

Pregnant Woman Carried On Cot : गडचिरोलीत पावसामुळं नदी- नाल्यांना पूर आलाय. कोरची तालुक्यातील चरवीदंड येथील एका गरोदर महिलेला प्रसुती वेदना जाणवत होत्या. मात्र, नाल्यावर पूल आणि रस्ता नसल्यानं नातेवाईकांना खाटेची कावड तयार करून महिलेला भरपावसात रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली.

Gadchiroli News
गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड (ETV Bharat Reporter)

गडचिरोली Pregnant Woman Carried On Cot : एकीकडं भारत डिजिटल आणि स्मार्ट होण्याचं स्वप्न पाहतो, तर दुसरीकडं याच भारतातील ग्रामीण भागात आजही जीवनावश्यक सोयी-सुविधा नसल्याचं दिसून येतं. शहरांमध्ये मोठमोठे रुग्णालयं तयार झाले. हाय स्पीड रस्ते, पूल तयार होत आहेत. पण, दुसरीकडं गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात साधे रस्ते आणि रुग्णालय नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. असाच एक प्रकार समोर आलाय.

खाटेची कावड करून गरोदर महिलेला घेवून जाताना नातेवाईक (ETV Bharat Reporter)

खाटेची कावड करुन पायपीट : पावसाच्या दिवसांत गरोदर महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात गडचिरोलीत दरवर्षी अडचणी येतात. अशीच एक धक्कदायक घटना कोरची तालुक्यात घडली आहे. 22 वर्षीय गरोदर महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेनं दोन किलोमीटरपर्यंत न्यावं लागलं. गरोदर महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली, परंतु प्रसुतीनंतर तिचं बाळ दगावलं. (Baby Dies) रोशनी कमरो असं महिलेचं नाव आहे.

खाटेची केली कावड : रोशनी कमरो यांना शनिवारी प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी केरामीटोला ते चरवीदंड गावादरम्यानच्या नाल्यावरून पाणी भरून वाहत होतं. रुग्णालयात दाखल करण्यासाठी रोशनीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीनं खाटेची कावड करून तिला चरवीदंडपर्यंत नेलं. तेथून खासगी वाहनाने कोरची रुग्णालयात दाखल केलं. परंतु, तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं.

काही तासांतच दगावलं बाळ : अडचणींचा हा प्रवास येथेच थांबला नाही. रुग्णवाहिकेद्वारे तिला गडचिरोलीला हलवण्यात येत होतं. मात्र, बेळगाव-पुराडादरम्यान घाटमाथ्यावरच्या रस्त्यावरच बिघाड झालेले दोन ट्रक उभे होते. वाहतूक खोळंबल्यामुळं दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा होत्या. यामुळं गरोदर महिलेला तब्बल अर्धा किलोमीटर पायी जावे लागले. असा कठीण प्रवास करत महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली, पण प्रसुती होताच काही तासांतच तिचं बाळ दगावलं. गडचिरोली जिल्ह्यात पूर आणि पावसाचा फटका गरोदर महिलांना सातत्यानं बसत आहे. अतिदुर्गम भागातील आरोग्य सुविधांच्या अभावानं सुरू असलेल्या या कठीण प्रवासाबद्दल नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -

  1. गरोदर महिलेला कळा सहन होईनात, नदीला आला महापूर, गावात रस्ता नाही...तहसीलदार बनले 'देवदूत' - Pregnant Woman Rescue Gadchiroli
  2. Palghar pregnant woman गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना बंद पडली जीप, खराब रस्ता असल्याने हाल
  3. दुर्दैवी! बांबूच्या डोलीतून गरोदर महिलेला दोन किलोमीटर चालत आणावं लागलं; भुदरगड तालुक्यातील घटना

Last Updated : Aug 6, 2024, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.