ETV Bharat / state

अकोले दुर्घटना : मृत वीर जवानांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर, विखे पाटलांची माहिती - SDRF Boat Accident - SDRF BOAT ACCIDENT

Pravara River SDRF Boat Overturned : अकोले तालुक्यातील सुगावा येथे गुरुवारी (23 मे) धक्कादायक घटना घडली. प्रवरा नदीपात्रात बुडून मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात उलटली. यावेळी बोटीतील तीन जवानांचा मृत्यू झाला.

Pravara River SDRF Boat Overturned
अकोले एसडीआरएफ बोट दुर्घटना (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 12:56 PM IST

अहमदनगर Pravara River SDRF Boat Overturned : अकोले तालुक्यातील सुगाव येथे गुरुवारी (23 मे) प्रवरा नदीपात्रात बुडून मृत पावलेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एसडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं होतं. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केलं. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं बचाव पथकाची बोटही प्रवरा नदीपात्रात उलटली. यावेळी या पथकातील पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिंतराव पवार यांना पुढील उपचाराकरता स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर आता या घटनेत मृत झालेल्या एसडीआरएफ जवानांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.

सदरील घटनेचं वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसंच दुपारी स्वत: विखे पाटील, मा. आ. वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसूल आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले होते.

जवानांना श्रध्दांजली : मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. पोलीस पथकाकडून बंदुकीची सलामी देण्यात आल्यानंतर जवानांचे मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले.

10 लाखांची मदत : या सर्व जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्‍यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडं रवाना करण्‍यात आले असल्‍याचं त्‍यांनी सांगितलं. तसंच पाण्‍यामध्‍ये बुडालेल्‍या अन्‍य दोन व्‍यक्तींचा तपास करण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येत असून, धरणातून पाण्‍याचा प्रवाहही आता बंद करण्‍यात आलाय. याच कारणासाठी युवकांनी केलेल्‍या रास्‍ता रोको आंदोलनासही मंत्री विखे पाटील यांनी भेट दिली.

हेही वाचा -

  1. धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या बचाव कार्यासाठी गेलेल्या एसडीआरफची बोट उलटली, तीन जवानांचा मृत्यू - Pravara River SDRF Boat
  2. उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण - Ujani dam news
  3. झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.