सातारा : सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, चारचाकी वाहनांसह 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 45 जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांकडून जुगार अड्डा उध्वस्त : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावच्या हद्दीतील एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे शिरवळ आणि भुईंज पोलिसांच्या संयुक्त पथकानं छापा मारला असता एकूण 43 जण जुगार खेळताना सापडले. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी दारू, मोबाईल, 6 चारचाकी आणि 14 दुचाकी वाहने असा एकूण 1 कोटी 9 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
साताऱ्यातील आरोपींची संख्या जास्त : शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गजें, आरसीपी प्लाटूनचे जवान आणि शिरवळ, भुईंज पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये जुगार अड्डा चालक, पोल्ट्री फार्मच्या मालकासह एकूण 45 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सातारा जिल्ह्यातील फलटण खंडाळा, वाई तसंच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, वेल्हा, सासवड, पुरंदर, कात्रज, स्वारगेट, बिबवेवाडी, सिंहगड रोड या परिसरातील आहेत.
आरोपींची नावं : जुगार अड्डा चालक रमजान उर्फ मुद्रा गणीभाई शेख, पोल्ट्री शेड मालक रमेश बाबासाो मोटे, राहुल सिध्दराम गोंडगाव, विजय पांडुरंग भंडलकर, अनिश शमशुद्दीन खान, असिफ अफजल खान, अभयसिंह चंद्रकांत नावरे, प्रकाश बच्चन राऊत, बापू लक्ष्मण आगम, भूषण शिवाजी शिंदे, महेंद्र विष्णू फडतरे, विलास सुरेश वैराट, वैभव विजय भुतकर, शब्बीर गफार पठाण, शाहिन शौकत बागवान, प्रकाश अशोक जाधव, विकास संजय पवार, मयुर अशोक जाधव, ऋषीकेश बंडू पवार, अशोक सोपान चिकणे, मिलींद साहेबराच विहीळकर, अविनाश भानुदास पेडकर, तानाजी शामराव कोळपे, चंदन अशोक काकडे, विठ्ठल भिकोबा घुमाळ, सोमनाथ बाळासो जाधव, रोहित बाळू कुंभकर, सुर्यकांत हरीश्चंद्र साळुंखे, धर्मेंद्र पिसुलाल जैन, विशाल भारत नगरे, आकाश संजय जगताप, प्रशांत रमेश जगताप, स्वप्नील विनायक जगताप, गोरख वसंत कांबळे, आप्पासो लालासो सालगुडे, लक्ष्मण गणपत गोफणे, राजेंद्र उत्तम तावरि, सुनिल किसन मुळीक, सागर एकनाथ गायकवाड, सुभाष गणपत गायकवाड, नंदू मनीराम जस्वाल, तुकाराम साहेबराव दराडे, ज्ञानेश्वर गजानन बालपांडे, सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी, राम भुजंग साठे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
हेही वाचा