ETV Bharat / state

तरुणीसमोर पॅन्ट काढणारा नराधम रिक्षा चालक अटकेत; रिक्षाच्या दोन आकड्यांवरुन लागला शोध - Rickshaw Driver Molestation Girl - RICKSHAW DRIVER MOLESTATION GIRL

Rickshaw Driver Molestation Girl : राज्यात महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. बदलापूर घटनेनंतर अशी प्रकरणं रोज समोर येत आहेत. रिक्षा चालकानं तरुणीसमोर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय.

Rickshaw Driver Molestation Girl
रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 6:25 PM IST

Updated : Aug 31, 2024, 6:52 PM IST

छत्रपती संभाजीनगर Rickshaw Driver Molestation Girl : महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना राज्यात रोज कुठे ना कुठे मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. 'एक्सरे' करण्यासाठी तरुणीला कपडे काढण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार घाटी रुग्णालयात घडला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता एका रिक्षा चालकानं प्रवासी तरुणीसमोर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे, हा चालक १० दिवसांपूर्वीच एका गुन्ह्यात जामीन घेऊन बाहेर आला होता. घटना घडल्यावर ५ दिवस आरोपी फरार होता. रिक्षाच्या मिळालेल्या दोन अंकांचा माग घेत समीर बाबा पठाण या विकृत रिक्षा चालकाला वेदांत नगर पोलिसांनी अटक केली.

पोलिसांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

तरुणीसमोर अश्लील चाळे : पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी एक तरुणी २५ जून रोजी रिक्षानं छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी या मार्गानं जात होती. "तुला पैसे पाहिजेत का?" असं म्हणत रिक्षा चालक बाबा पठाण यानं तिच्या समोर पॅन्ट काढून अश्लील कृत्य करू लागला. या प्रकारानं भयभीत झालेल्या तरुणीनं आरडाओरड करत रिक्षा थांबवण्यास सांगितलं आणि ती पळून गेली. हा प्रकार तिनं कुटुंबियांना सांगितला. त्यांनी तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार दिली, गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता.

घर बदलून झाला पसार : गुन्हा दखल होताच पोलिसांनी आरोपी समीर बाबा पठाण याला अटक करण्यासाठी पथक रवाना केले. रिक्षाचा नंबर देताना त्यातील दोनच आकडे पीडित तरुणीच्या लक्षात होते. त्यावरून आरोपीचा तपास सुरू केला. सदरील आरोपीची ओळख पटली, त्याचा पत्ता मिळाला. मात्र, तो फरार झाला होता. त्यानं आपलं घर देखील बदललं होतं. त्यामुळं त्याला ताब्यात घेण्यास अडचण निर्माण झाली होती.

आरोपीला अटक : खुलताबाद, हर्सूल, जटवाडा, मालेगाव येथे आरोपीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, सिटीचौक पोलिसात दाखल ३०७ अंतर्गत कलमात त्याला अटक झाली होती, नुकताच तो कारागृहातून बाहेर आल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी आरोपी जटवाडा येथील एका गावात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वेदांत नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. वर्दळीच्या ठिकाणी देखील मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय.

हेही वाचा

  1. ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault
  2. बंद घरात आढळले तिघांचे कुजलेले मृतदेह: पत्र्याच्या पेटीत माय लेकीचा तर बाथरुममध्ये वडिलाचं आढळलं शव, नागरिक हादरले - Found 3 Dead Body In House
  3. जोडप्याकडून पैसे उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन, नवघर पोलीस ठाण्यातील घटना - Police personnel suspended

Last Updated : Aug 31, 2024, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.