ETV Bharat / state

वाढवण बंदरामुळं दोन लाख तरुणांना रोजगाराची संधी; देशातील एकमेव नैसर्गिक बंदर, वाचा सर्वकाही फक्त एका क्लिकवर - PM Modi Vadhavan Port Bhoomi Pujan - PM MODI VADHAVAN PORT BHOOMI PUJAN

PM Modi Vadhavan Port Bhoomi Pujan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (30 ऑगस्ट) देशातील सगळ्यात मोठ्या असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. हे बंदर तयार करण्यासाठी तब्बल 76 हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या बंदरामुळं 2 लाख तरुणांना नोकरी मिळेल. मात्र बंदराला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला. का आहे हे बंदर भारतासाठी खास? वाचा सविस्तर बातमी....

Pm Modi Maharashtra Visit
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 7:27 AM IST

Updated : Aug 30, 2024, 4:44 PM IST

पालघर PM Modi Vadhavan Port Bhoomi Pujan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं. या बंदराला 76 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळं दोन लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, या बंदरामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, तसेच मासेमारी धोक्यात येणार असल्याचा आरोप करत मच्छीमारांनी आंदोलन केलं.

‘ऑल वेदर ग्रीनफील्ड’ बंदराच्या निर्मितीला मान्यता : केंद्र सरकारनं पालघरजवळील वाढवणमध्ये ‘ऑल वेदर ग्रीनफील्ड’ बंदराच्या निर्मितीला मान्यता दिली आहे. वाढवण बंदराची जागा ही अत्यंत खास आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर इथं येऊ शकतील. ते कंटेनर लोड-अनलोड करता येतील. या बंदराचं बांधकाम दोन टप्प्यामध्ये ‘लँड लॉर्ड पोर्ट’च्या आधारावर करण्यात येणार असून 76 हजार 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 298 दशलक्ष टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल. या बंदराचं काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दोन दशकांचा कालावधी लागेल.

कसं असेल वाढवण बंदर ? : सध्या देशात असलेल्या बंदरांमध्ये या बंदराची क्षमता सर्वात जास्त होणार आहे. या बंदरामध्ये चार बहुउद्देशीय बर्थ असतील. त्याचबरोबर चार लिक्विड बल्क बर्थ, एक आरओ-आरओ बर्थ, स्मॉल क्राफ्ट, कोस्ट गार्ड बर्थ आणि रेल्वे टर्मिनलचा समावेश आहे. वाढवण बंदरामध्ये 10.4 किलोमीटर लाँग ब्रेक वॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, शोर प्रोटेक्शन, बंड, टग बर्थ, एप्रोच ट्रेस्टल्स एंड अनपेव्ड डेवल्पड लँड आणि रेल्वे आणि रोड लिंकेजचे निर्माण केलं जाईल. त्याचबरोबर ऑफ डॉक रेल्वे यार्ड, रेल्वे एक्सचेंज यार्ड, पॉवर अँड वाटर आणि अंतर्गत रस्त्यांसह कोर अँड कॉमन इंफ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली जाईल.

जगातील पहिल्या दहा बंदरात समावेश : देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा विचार करून ‘डीप ड्रॉफ्ट पोर्ट’ची निर्मिती केली जात आहे. सरकार याच उद्देशानं हे बंदर विकसित करत आहे. त्यामुळे देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता पूर्ण होईल. या बंदराचा विकास झाल्यानंतर देशातील पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरणास चालना मिळेल. या बंदरातून कोळसा, सिमेंट, रसायनं आणि इंधनाची वाहतूक होईल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. या बंदराची क्षमता 24.5 मिलियन टीईयू आहे. देशातील अन्य कोणत्याही बंदराला नैसर्गिक मर्यादेमुळे ही क्षमता गाठणं शक्य नाही.

चाबहार बंदराशी कनेक्शन : वाढवण बंदर तयार झाल्यानंतर देशाला त्याचा आणखी फायदा होईल. इराणमध्ये भारत चाबहार बंदर विकसित करत आहे. चाबहार करारानंतर या मार्गाचा आणखी चांगल्या पद्धतीनं वापर करता येईल. वाढवण बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर डेपो होणार आहे. त्यानंतर भारत अधिक क्षमतेनं आपल्या मालाची निर्यात करू शकेल. वाढवण बंदराची खोली अधिक असल्यानं मोठे कंटेनर इथून सहजपणे ये-जा करू शकतील. भारतामधील माल वाढवण बंदरातून चाबहार बंदराच्या मार्गानं युरोप, मध्य आशिया आणि अगदी रशियापर्यंतही पोहोचेल. या देशातील माल आयात करण्यासाठीही या बंदराचा फायदा होणार आहे.

नैसर्गिक बंदर असल्यानं महत्त्व : आपल्या देशात इतका मोठा कोणताही कंटेनर पोर्ट नाही. त्यामुळे मालाची ने-आण करण्यासाठी जास्त वेळ लागतो. तो प्रश्न या बंदरामुळे सुटणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही यामुळे बळ मिळेल. वाढवण बंदरच्या बांधकामाला फेब्रुवारी 2020 मधील सागरमाला प्रोजेक्टमध्येच मंजुरी मिळाली होती. 2014 पासूनच हे बंदर विकसित करण्यासाठी सरकानं विशेष स्वारस्य दाखवलं आहे. त्यामुळे या बंदराला पंतप्रधान मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जात आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गापासून काही अंतरावरच असल्यानं या बंदराला मोठं महत्त्व आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, हे बंदर विकसित झाल्यानंतर भारताला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशांमधील व्यापाराची गरज पूर्ण करता येईल.

वाढवण बंदरामुळे मच्छीमार नाराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे राज्यातील मच्छीमारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. या भूमिपूजनाला राज्यातील मच्छीमार कडाडून विरोध करणार आहेत. उत्तन, भाईंदर इथं झालेल्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी दिली. "वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 60 पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. मच्छीमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही, परंतु विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. अशा विध्वंसक प्रकल्पांना कडाडून विरोध हा समाज शेवटपर्यंत करत राहणार आहे," असं समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितलं.

वसई तहसील कार्यालयावर मोर्चा : या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छीमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे. समुद्रातील एकूण 30 हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचं भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध होणार असल्याचं समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी सांगितलं. वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेत यात्रा आंदोलनात मोठ्या संख्येनं मच्छीमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वसई येथील मच्छीमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी काढणार 'सरकारची प्रेतयात्रा' - Vadhavan Port Palghar
  2. वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी, १२ लाख लोकांना रोजगाराची संधी, स्थानिकांचा विरोध कायम - Vadhavan port
  3. पालघर बंदराला विरोध करणाऱ्यांना युवा एल्गार आघाडी समर्थन देणार, लोकसभा निवडणूकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय - Lok Sabha election 2024

Last Updated : Aug 30, 2024, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.